‘उर्जायान’ त्रैमासिक हे अंक वास्तवाची ओळख करून देणारं व भविष्यामध्ये होणाऱ्या क्रांतिकारी बदलाकडे नेणारं आहे . खरंच उर्जायान त्रैमासिक हे अंक हाती पडताच मनाला वेधून घेतले. ऊर्जायान त्रैमासिक या अंकाचे मुखपृष्ठ पाहताच वाचण्याची ओढ निर्माण झाली. या अंकाच्या अंतरांगमध्ये प्रवेश करताच पहिली यशाची पायरी शिक्षण, या व्यवस्थेमधल्या बदलाकडे नेऊन नवीन विचारांची ऊर्जा देते. तसेच शिक्षणामध्ये येणार माध्यम इंग्रजी याची असणारी भीती ही कठोर परिश्रमाने नष्ट करून यश मिळवू शकतो याची खात्री देते.तसेच इतर लेख हे वाचकांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून दूरदृष्टी देणारे आहे.
तांत्रिक लेखन: एक आकलन हा लेख नवीन लेखनाकडे नवी क्रांतिकारी विचारांची ओढ निर्माण करते.तसेच इतर लेख महिला ‘राज’कारणातील पन्नास टक्क्यांची ठसठस या लेखामध्ये स्त्रीची भूमिका राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्टपणे बजावली ती खरंच वाचकांचे मन वेधून घेणारे आहे. तसेच भीम जयंती : शोध व बोध या लेखामध्ये असणारे डॉ बाबासाहेबांचे अविरत चालणारे बलाढ्य क्रांतिकारी विचार खरंच नवीन क्रांती निर्माण करणारे आहे. त्यांचे विचार एका समाजासाठी नाही, तर त्यांची महाऊर्जा संपूर्ण मानवाच्या उन्नतीसाठी आहे. हा विचार खरंच मनाला केंद्रित करून नवीन क्रांतिकारी वाटचालिकडे नेणारे आहे.
मी हा अंक वाचला खरंच खूप उत्कृष्ट वाटला. याचबरोबर इतर लेख, कविता, समीक्षा वाचकाचा मनाला मंत्रमुग्ध करून त्यात नवीन विचार व ऊर्जा यांची क्रांती निर्माण करते. तसेच संदीप गायकवाड सर यांच्या ‘माणूस’ या कथेतून उर्जायान त्रैमासिक याला नवीन दिशा मिळाली व शिक्षणामुळे समाजामध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणू शकतो या दिशेने लक्ष वेधून घेतले.खरंच हा अंक समाजामध्ये समता, बंधुता आणि स्वतंत्रता निर्माण करणारा एक क्रांतिकारी बदल आहे. मी मा. संपादक सर व मंडळ यांचे खूप आभार मानते की त्यांनी माझा लेख या अंकात प्रकाशित केला. तसेच भविष्यामध्ये होणाऱ्या नवीन परिवर्तनाच्या वाटचालीसाठी मन:पूर्वक खूप खूप शभेच्छा…..
धन्यवाद
✒️तेजस्वी वि. मिलमिले