▪️जैन हिल्स ला फालीच्या अकराव्या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद
✒️जळगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
जळगा(दि.३०एप्रिल):-कुठलाही उद्योग व्यवसायाच्या भरभराटीसाठी कृषी क्षेत्र महत्त्वाचे आहे. शेतमाऊली एका दाणाचे हजार दाणे देत असते त्यामुळे रोजगाराची निर्मितीसुद्धा यातून होते. शेत, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळाली तर खऱ्या अर्थाने शेतकरी पोशिंदा ठरेल यासाठी फाली च्या माध्यमातून देशाच्या भविष्याची गुंतवणूक आपल्या माध्यमातून समृद्ध होत आहे. एआय चा वापर, ऑटोमेशन, ड्रोन चा वापर यासह तंत्रज्ञानामुळे शेतीला बळ मिळते.
‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अकरावे अधिवेशनच्या दुसऱ्या टप्प्याची आज जैन हिल्सला सुरवात झाली. क्षेत्रभेटीनंतर शेतीविषयी सुसंवादात शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
आकाश ग्राऊंडवर झालेल्या चर्चासत्रात स्वप्नील चौधरी-नाचनखेडा, निरज चौधरी- दापोरा बु-हाणपूर, लोकेश रोटे-नशिराबाद, दीपक अरूण पाटील, सोनाळा-जामनेर,कल्पेश पाटील-नशिराबाद या शेतकऱ्यांनी संवाद साधला.
केळी, हळद, कापूस, डाळिंब, तुर, टरबूज, जैन स्विट ऑरेंज, मोसंबी, लिंबू, हरभरा उत्पादनातील बारकावे शेतक-यांनी सांगितले. सौलर योजनेसह टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळीच्या नफ्याचे गणिते, निर्यातक्षम उत्पादनासाठी जागतिक मानांकनासह शेती करण्याच्या पद्धती, तरूणांनी शेतीमध्ये करावयाचे बदल, फ्रुटकेअर, प्रकिया उद्योग यासह अन्य प्रश्नांवर शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांनी चर्चा केली. पुर्वा खरात, सायली बांगे, जय गवांडे, भक्ती देवकर, पुष्पक शिवांकर, सानिका बोडके या फाली विद्यार्थ्यांनी लीड केले.
शेतीतून जास्त उत्पादन वाढीसाठी पाच घटक महत्वाचे आहे. माती, पाणी, सूर्यप्रकाश, कीड नियंत्रण, तण नियंत्रण यावर शेती अवलंबून असते. यातील जमीनीची सुपिकता महत्त्वाची आहे फक्त रासायनिक किंवा जैविक खतांचा वापर न करता त्याचे संतुलन ठेवले पाहिजे. नोकरी पेक्षा शेती तुन जास्त उत्पादन होते. पिकानुसार, आवश्यकतेनुसार खत, पाणी दिले पाहिजे जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल परिणामी अधिक नफा होईल. रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
*दुसऱ्या टप्प्यातील पहिला दिवस*
फाली उपक्रमात दुसऱ्या टप्प्यात ४०० विद्यार्थी व फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, जैन हिल्स शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्र, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू, टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
*अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा*
दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे राऊंट राबिन गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील, डॉ. पंचभाई, डॉ. सुब्रमण्यम, डॉ. कल्याणी मोहरीर हे तसेच संजीव भेस्त (आयटी सी), सचिन शर्मा (प्रोमेप्ट), सनचेत जैन ( अग्रीबाजार), रितेश सुतेरा (प्रोम्पट डेअरी), डॉ. समीर मुधुली, निखील सोनडे (गोदरेज), कपिल रेनवा (स्टार अग्री) त्याच प्रमाणे चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्रगतशील शेतकरी अशोक देविदास महाजन, स्वप्नील व्यास (चोपडा) सहभागी झाले होते.
*आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण*
फाली-११ मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.