

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.24एप्रिल):-तालुक्यातील मौ. धारासुर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोक सभागृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठया उत्सहात साजरी करण्यात आली. गंगाखेड मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. रत्नाकरजी गुट्टे यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लक्ष रुपये खर्च करून सभागृह बांधण्यात आले यावेळी सभागृहाचा लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला दरम्यान सभागृहाचे उदघाट्न गंगाखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सत्यपालजी साळवे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमास गंगाखेडचा तहसीलदार मा. उषाकिरण श्रृंगारे, मा. डी. एन दाभाडे, परभणी आय सी. यु. चे मा. डॉ. सूर्यकांत देशमुख, नगरसेवक श्रीमती. वनश्रीताई साळवे, पं स. सदस्य मा. प्रतापराव कदम धारासूर ग्रामपंचायतचे सरपंच राजेभाऊ गवळे, मा. पं. सं. सदस्य वंदनाताई गवळे, उपसरपंच अॅड. हर्षलाताई कदम, मा. डॉ. नितीन कदम, मा. डॉ. अनिल कानडे, मा. शशिकांतजी गवळे, अतुल जाधव, मा. अंगद जाधव, ओम कदम, मा. श्रीकांत गायकवाड मा. धम्मा पवार, नारायण शिंदे, लक्ष्मण कदम, मा. निवृत्ती कदम, ग्राम विकास अधिकारी मा. हरिश्चंद्र कुंडगीर, मा. भगवानराव गव्हाणे तलाठी श्री. शिवणकर, श्री. साबणे श्री. मयूर यांच्या सह मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्या साठी जयंती उत्सव समितीचे नारायण गवळे, सिद्धोधन गवळे, संदीप मस्के, शैलेश जंगले, उत्तम गवळे, किशोर गवळे, प्रीतम गवळे, विठ्ठल क्षीरसागर, विशाल शेळके, नितीन शेळके, महेंद्र गवळे, रतन गवळे, अमोल गवळे, रमेश गवळे, राहुल मस्के, सुरज गवळे, प्रेम अवचार, सुमेध मस्के, अनिकेत गवळे, आदर्श गवळे, प्रताप गवळे, दीक्षा गवळी, रमा गवळे, प्रियंका मस्के, निशा गवळे, सीमा गवळे, गोदावरी गवळे, काजल गवळे, शोभा शेळके, अनिता जंगले, प्रीती गवळे, मनीषा गवळे, दीक्षा शेळके, लक्ष्मीबाई गवळे, रुक्मीनबाई गवळे, सुनिता गवळे, अश्विनी मुंडे, जयश्री मस्के, दिपाली गवळे यांच्या सह जय भीम मित्रमंडळ व महिला मंडळांनी परिश्रम घेतले.







