

▪️प्रा.डॉ.अनंता सूर,मा.सुषमा पाखरे,प्राचार्य डॉ.गोपीचंद मेश्राम,प्रा.मुकुंद भारसाकळे, प्रा.डॉ.वसंत शेंडे,डॉ.भास्कर पाटील,डॉ.रविकांत महिंदकर, प्रा.अरुण बुंदेले,डॉ.विलास काळे यांची उपस्थिती
▪️उद्घाटन,परिसंवाद,गझल मुशायरा,परिवर्तनवादी कवीसंमेलन,मान्यवरांचा सत्कार समारंभया कार्यक्रमांनी गाजणार संमेलन
✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अमरावती(दि.12मे):-बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृतिदिन,स्मृतीशेष क्रांतिवीर सुखदेवराव तिडके स्मृती दिन,स्मृतीशेष सूर्यभानजी मेश्राम यांच्या स्मृती दिनानिमित्त शब्दास्त्र विचार मंच, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट अमरावती द्वारा,चौथे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन ,रविवार,दि.१७ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन,भीम टेकडी अमरावती येथे करण्यात आले आहे.
सकाळी १०:३० वाजता साहित्य संमेलनास सुरुवात होईल. मा.प्रा.डॉ.अनंता सूर आंबेडकरी अभ्यासक हे साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष असून उद्घाटक मा.सुषमा पाखरे आंबेडकरी साहित्यिका या आपले स्थान भूषवतील. स्वागताध्यक्षस्थानी मा.डॉ.गोपीचंद मेश्राम(माजी प्राचार्य) राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रबोधनकार मा.प्रा.मुकुंद भारसाकळे,मा. प्रा.डॉ.वसंत शेंडे (साहित्यिक), मा. प्रा. डॉ.भास्कर पाटील (साहित्यिक),मा. डॉ.रविकांत महिंदकर, परिवर्तनवादी साहित्यिक प्रा.अरुण बा. बुंदेले, मा.डॉ.विलास काळे असून प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य संयोजक मा.रमेशचंद्र कांबळे, प्रवीण कांबळे(मुख्य संयोजक, शब्दास्त्र), संयोजक टी.एफ. दहीवाडे, प्रा.देवानंद पाटील, विद्रोही अविनाश गोंडाणे, पद्माकर मांडवधरे, दिलीप शापामोहन,चरणदास नंदागवळी यांची उपस्थिती राहील.या साहित्य संमेलनास उपस्थित बुद्धिजीवी श्रोत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
पहिल्या उद्घाटकीय सत्रानंतर, दुसऱ्या सत्रामध्ये मा. सुदाम सोनुले ( ज्येष्ठ गझलकार) यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा होणार असून या गझल मुशायरात प्रख्यात गझलकार मा.विनय मिरासे,दीपाली सुशांत,अतुलकुमार ढोणे, सुनीता मेश्राम,अनिल अघम संघमित्रा खंडारे, प्रवीण कांबळे,गिरीश खोब्रागडे, विद्रोही अविनाश गोंडाणे, अब्दुल समद रजा हे गझलकार सहभागी होणार आहेत. संचालन पवन डोंगरे (राष्ट्रीय निवेदक) हे करतील तर आभार संजय डोंगरे हे मानतील. तिसऱ्या सत्रात मा. कुंदाताई सोनुले (आंबेडकरी अभ्यासक) यांच्या अध्यक्षतेत ” भारतीय लोकशाही आणि वर्तमान स्थिती “या विषयावर परिसंवाद होईल .या परिसंवादात मा. प्रा.सीमाताई मेश्राम, प्रा. डॉ.रजनी गेडाम,प्रा.दीपाली पडोळे,प्रतिभा प्रधान सहभागी होतील.संचालन सिद्धार्थ गोंडाणे तर आभार प्रेरणा पांडे मानतील.
चौथ्या सत्रात परिवर्तनवादी कवी व अभंगकार मा.प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या अध्यक्षतेखाली परिवर्तनवादी आंबेडकरी कवीसंमेलन पार पडणार असून मा.शीला भास्कर पाटील,शिवा प्रधान,सुजाता पुरी,प्रा.देवानंद पाटील,पद्माकर मांडवधरे,दिलीप शापामोहन, विशाल मोहोड,प्रा.हर्षवर्धन तायडे,श्री. न.डोंगरे, प्रा.निरंजन नवले,प्रा.हंसराज रंगारी,सारिका वणवे,दिनकर मडकवाडे,पवन डोंगरे,पूर्वा निजामशाही,मयुर गायकवाड,पद्मा घरडे,रिजवान शेख,रमेश राऊत,दीपिका पांडे,पल्लवी मते,रेखा राऊत, एम. बी. बागडे, सागर भोवते,इब्राहिम खान,मधु हिरेकर,प्रेरणा पांडे,वासुदेव डोंगरे,मोहिनी शापामोहन,संध्या संभे,ठवरे गुरुजी,गोवर्धन रामटेके,खुशाल गुल्हाने,नकुल नाईक हे कवी सहभागी होणार आहेत. संचालन सुशांत मेश्राम तर आभार राजेश्वरी नंदागवळी मानतील.
परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचा समारोप मा.डॉ.गोपीचंद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे मा.प्रा. डॉ.वसंत शेंडे,प्रा.अरुण बा. बुंदेले, टी.एफ. दहीवाडे,दिलीप घरडे यांच्या उपस्थितीत होईल.तरी आयोजित साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजन समितीने केले आहे.







