Home चंद्रपूर आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू

आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.4जून):-कौशल्य विकास व उद्योजकता नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत ऑगस्ट 2026 या सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू झाले असून संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे सुरू झाले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गेल्या 21 मे पासून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना निःशुल्क मार्गदर्शन सत्र सुरू करण्यात आलेले आहे. तसेच उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, रिक्ती व निश्चिती या केंद्रावर उमेदवार करू शकतील. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिका देण्यात आलेली माहिती व प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ऑनलाईन प्रवेशाकरिता ची सविस्तर माहिती तसेच प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता http://admission.dvet.gov.in⁠� ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संस्थेत प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, कारपेंटर, स्टेनो, कोपा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, मेसन, फूड टेक्नॉलॉजी, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मोटर मेकॅनिक, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, आर.ए.सी., वायरमन, आयसीटीएस, इत्यादी आणि व्यवसायात प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.

पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे (दहावी मार्कशीट, टीसी, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, नॉन क्रिमिलियर) व इतर शालेय प्रमाणपत्रासह प्रवेश अर्ज भरण्याकरिता व अधिक माहितीसाठी संस्थेमध्ये सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत संपर्क करावा असे आवाहन प्राचार्य, श्री. जी. यू. राजुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी केले आहे.