Home चंद्रपूर नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा बिगुल ; राजुरात सहविचार सभा...

नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदार नोंदणीचा बिगुल ; राजुरात सहविचार सभा उत्साहात संपन्न

24

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.4जून):– नागपूर पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, जनजागृती व मार्गदर्शनासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा चंद्रपूर आणि राजुरा तालुका काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पद्विधर मतदार नोंदणी आणि सहविचार सभा गुरुवारी राजुरा येथील सुपर मार्केट सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली.

          सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे होते. यावेळी विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, पदवीधर आमदार ॲड. अभिजीत वंजारी, शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील मतदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सुशिक्षित मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

        सुभाषभाऊ धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात पदवीधर मतदार संघ हा शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व करणारा महत्त्वाचा मतदार संघ असल्याचे सांगितले. पदवीधर युवक-युवतींनी मतदार नोंदणी प्रक्रियेत पुढाकार घेऊन अधिकाधिक पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष मा. अरुण धोटे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना मतदार नोंदणी मोहिमेला व्यापक जनसहभाग मिळवून देण्याचे आवाहन केले. सभेत मतदार नोंदणीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली.

      कार्यक्रमाला माजी प्राचार्य दौलतराव भोंगळे, प्राचार्य डॉ. संभाजी वरकड, विमाशीचे जिल्हा कार्यवाहक सुनील शेरकी, माजी जिल्हा कार्यवाहक केशवराव ठाकरे, जिल्हा कार्यवाहक सिनेट सदस्य दिपक धोपटे, मसुद सर, नगरसेवक सिद्धार्थ पथाडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, सभापती संतोष इंदूरवार, ॲड. अरुण धोटे, ॲड. सदानंद लांडे, पुंडलिक उराडे, मधुकर चापले, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, छायाताई मोहितकर, स्मिता धोटे, अरुणा दिवे, नगरसेवक एजाज अहमद, नगरसेविका संध्या चांदेकर, पूनम गिरसावळे, विमाशी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद चलाख, राजुरा शहर अध्यक्ष राजू डाहुले, कार्यवाह बाळा गोहोकार, ग्रामीण तालुका अध्यक्ष नितीन ठाकरे, कार्यवाह संदीप पिंपळकर, बादल बेले, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, पदवीधर युवक-युवती, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमाशीचे जिल्हा कार्यवाहक सुनिल शेरकी यांनी केले. संचालन आनंद चलाख यांनी तर आभार प्रदर्शन गोहोकार सर यांनी केले. उपस्थितांनी मार्गदर्शकांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदार नोंदणी अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.