

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.30एप्रिल):-महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त सत्यशोधक इतिहास परिषद आणि मानवतावादी सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने पुढील वर्षभर प्रबोधनपर दोनशे व्याख्यानांचा संकल्प करण्यात आला असून या अंतर्गत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सत्य हाच धर्म! करावा कायम!! ज्योती म्हणे! या विषयावर कणकवलीचे विचारवंत व साहित्यिक डॉ. सोमनाथ कदम यांचे पहिले जाहीर व्याख्यान रविवार दि. 3 मे, 2026 रोजी दुपारी 12:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केले असून कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत.
कोणताही देश, प्रदेश हा माणसांच्या कष्टावर, घामावर व त्यागावर उभा राहात असतो. आपला महाराष्ट्र उभा करण्यामध्येही अनेकांचे हात कामी आले आहेत. आजही अनेक हात आपला महाराष्ट्र उभा करण्यासाठी रात्रंदिवस राबत आहेत. अशाच राबणाऱ्या आणि नाविन्यपूर्ण काहीतरी करणार्या विजय शिंगाडे, मदन पवार, विकास डावरे, आशा रावण, लालासाहेब नाईक, डॉ. आशा शितोळे, भगवान माने, देवीदास पांचाळ, संतोष कमते, प्रतिक्षा पाटील या मान्यवरांच्या हातांचा क्रियेटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानवतावादी संस्कृती चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर यांनी केली आहे. संपर्क 9822472109







