🔺ग्राहका सोबत दररोज चा राडा.. बँकेत निराधार महिलांना विड्रॉल मिळेना
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.10मे):-दि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक गंगाखेड येथे ग्राहका सोबत प्रशासना मार्फत सेवा देत असताना दैनंदिन अडचणीमध्ये वाढ होत असून निराधार महिलांनाही विड्रॉल दिल्या जात नसून.प्रवेशद्वार गेट प्रशासनाच्या वतीने बंद करून कारभार केला जात आहे. ग्राहकांना गेटच्या बाहेर उभा टाकूनच आर्थिक व्यवहार केला जात असल्याचे ग्राहकाचे म्हणणे आहे.मध्यवर्ती बँकेमार्फत सेवा देत असताना भर उन्हाळ्यात ग्राहकांना गेटच्या बाहेर उभा टाकून सेवा दिल्या जाते.
ग्राहकांना कधी-कधी कॅश नसल्यामुळे वापस जावे लागते. .दुसऱ्या दिवशी बँकेत येऊनही पैसे दिले जात नाहीत.एवढेच नाही तर निराधार महिलांना पैसे काढण्याची स्लिप सुद्धा दिल्या जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात पैशासाठी ताटकळत उन्हामध्ये बसावे लागत असून कधीतरी बँके मार्फत पेंडॉल टाकण्यात येतो.परंतु पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासना मार्फत केल्या जात नाही असे ग्राहक सांगतात.
मध्यवर्ती बँकेमार्फत प्रचंड अडचणी असताना प्रतिनिधी यांनी बँक मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता ” गेट कशामुळे बंद आहे माहित नाही..? ” पैसे काढण्याची स्लीप विड्रॉल याबाबत ही माहिती नाही..? पैसे काढण्याची स्लिप महिलांना का मिळत नाही..? अशी उडवीची उत्तरे देत प्रशासना मार्फत ग्राहकांना सेवा देण्य ऐवजी तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे परभणी वरिष्ठ अधिकारी या बाबीकडे लक्ष देतील का. असे ग्राहकांना वाटते.