चिमुरात तिन युवकांनी केला 19 वर्षीय युवतीवर बलात्कार-दोन आरोपी अटकेत तर एक फरार

322

✒️चिमुर(पुरोगामी न्युज नेटवर्क)मो:-9423608179

चिमुर(दि.20मे):-पोलिस स्टेशन चिमुर अंतर्गत येत असलेल्या एका वार्डात राहणाऱ्या 19 वर्षीय युवतीवर तिन युवकांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना आज दिनांक 20 मे रोजी उघड झाली.

पिडीत युवती ही तिचे आजीचे घरी (गोंड मोहल्ला) चिमुर येथे पायदळ जात असतांना प्रतिक सुनिल साटोणे (वय 26 वर्षे) हा तीचे जवळ येवुन ‘तुला तुझ्या आजीच्या घरी सोडुन देतो’ असे सांगुन मोटर सायकलवर बसविले, पिडीतेला आजीचे घरी न सोडता मोटार सायकल तळोधी (ना.) रस्त्याचे बाजूला शेतशिवारात असलेल्या झोपडीत नेले, तिथे तिचेसोबत जबरदस्तीने शारिरीक सबंध केले. त्यानंतर विक्की उर्फ विक्रांत खुशाल साटोणे (29 वर्षे) व अंकित संजय काकडे (वय 31 वर्षे) हे घटनास्थळावर येवुन त्यांनी सुद्धा पिडीत युवतीसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. या प्रकरणाची कुणालाही माहिती दिल्यास जिवे मारण्याची तिन्ही आरोपीने धमकी दिली असल्याचे पिडीतीच्या तक्रारीत म्हटले आहे. प्रतिक साटोणे व विक्की साटोणे हे नेताजी वार्ड व अंकित संजय काकडे हा शिक्षक कॉलनी चिमुर येथील रहिवासी आहेत. यातील दोन आरोपींना अटक केली असुन अंकित संजय काकडे हा फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बलात्काराची घटना 1 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 च्या दरम्यानची असुन आज दि. 30 मे 2025 रोजी पिडीतीने चिमुर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिस विभागाने भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 64,70 (1), 351(2),3(5) नुसार गुन्हा दाखल केला.

पिडीत युवतीला वैद्यकिय तपासणी करीता चंद्रपुरला पाठविण्यात आले असुन आरोपीची गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आली.

 या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संतोष बाकल यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक दीप्ती मरकाम, पोलीस शिपाई सतीश झीलपे करीत आहेत.