डीपी पोलीसद्वारा चोरटी वायगाव मधील अवैध्य दारू विक्रेत्या कडून जोमात हफ्ता वसुली 

40

🔺पोलीसांच्या कारवाई वर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह 

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.22मे):-तहसील मधील पोलीस ठाण्या अंतर्गत स्थित चोरटी वायगाव येथे अवैध्य दारू विक्री सुरु आहे. अवैध्य दारू विक्रीवर बंदी करण्या ऐवजी संबंधित ब्रम्हपुरी डीपी पोलीस कडून चोरटी वायगाव मधील अवैध्य दारू विक्रेत्या कडून जोमात हफ्ता वसुली सुरु आहे. यामुळे पोलीसांच्या कारवाई वर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.

चंद्रपूर जिल्हामध्ये दारूबंदी असताना लाडल्या लोकप्रतिनिधी द्वारे दारू विक्री सुरु करण्यात आली. अनेकांचे घर उद्वस्त झाले. दारू च्या नशेने अनेक युवकांचा मृत्यूचा प्रमाण वाढला. तरीही तालुक्यातील अनेक गावामध्ये अवैध्य दारू विक्रीला जोर आला आहे. अशा वेळी संबधित पोलीस अधिकाऱ्यांडून अवैध्य दारू विक्रेत्या वर योग्य ती कारवाई करायला पाहिजे ती होत नाही. कारवाई न करता अवैध्य दारू विक्रेत्या कडून हफ्ता वसुल केल्या जाते. हफ्ता नाही दिल्यास धमाकावल्या जाते. अश्या हफ्ता वसुल करणाऱ्या वर्दीत लपलेल्या पोलीस डाकुवर कारवाई झाली पाहिजे अशी नागरिका मध्ये चर्चा आहे.

नागरिक पोलीससांच्या दोन हात दूर राहणे पसंद करतात. नागरिकांना माहिती होऊन गेलं आहे की पुलिस हफ्ता वसुल करणारे जास्त आणि कारवाई करण्यास दिरंगाई करण्यात मस्त आहेत. ही सगळी परिस्थिती बघता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हफ्त्या घेणाऱ्या पोलीसांना जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.