✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.1एप्रिल):- ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे महाविद्यालयाचे समान संधी केंद्राच्या वतीने ३० एप्रिल २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११६ व्या जयंतीचे आयोजन मोठ्या आदरभावाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या थोर संत-कवी आणि समाजसुधारकाच्या आध्यात्मिक जागृती आणि राष्ट्रीय ऐक्याच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या फोटोवर हार आणि पुष्प अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा आस्वले यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजसुधारणा, शिक्षण आणि पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील तुकडोजी महाराजांच्या योगदानावर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्ट केले की भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांद्वारे महाराजांनी समाजात जागृती निर्माण केली.
तसेच, नि:स्वार्थ सेवा, ऐक्य आणि नैतिक मूल्ये यावर आधारित त्यांचे विचार उलगडले. या कार्यक्रमाला समान संधी केंद्र च्या समन्वयक सरताज शेख व सोबतच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.