✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.1एप्रिल):-ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी , महाकाली नगरी देवाडा येथील माणिक कुटी भवनात महाराष्ट्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या संचालिका श्रीमती रजनी बोढेकर यांनी ध्वजारोहण केले. तसेच उपस्थित बाल मंडळींना खाऊचे वाटप केले. यावेळी या शुभमुहूर्तावर दरवर्षी प्रमाणे यंदाही समर कॅम्प ची सुरुवात करण्यात आली.
यावेळी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सुप्रसिद्ध योगा टिचर सौ. वैजयंती गहुकर, विकास गहुकर आदींची उपस्थिती होती. आलेल्या अतिथींचे स्वागत मास्टर ग्रिष्म, एलिना, रूहान आदिंनी केले.