▪️शेकडो विद्यार्थांनी घेतला उत्स्पूर्त सहभाग
▪️देशाच्या उज्वल भविष्याकरिता बाल सुसंस्कार शिबिरांची आवश्यकता – ऍड. जयंत साळवे
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.७मे):-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ग्रामगीता प्रणित बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे दि.६ मे ते १६ मे २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून ऍड. जयंत साळवे, अध्यक्ष, ग्रा.स.शि.प्र.मं.चंद्रपूर यांची उपस्थिती होती. तर उद्घाटक म्हणून विठ्ठलराव सावरकर, विदर्भ प्रांत सेवाधिकारी, गुरुकुंज आश्रम मोझरी यांची उपस्थिती होती. प्रमूख अतिथी म्हणून प्रा. अशोक चरडे, जिल्हा सेवाधीकारी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ,चंद्रपूर, प्रेमलालजी पारधी, जिल्हाप्रमुख, ग्रामगीता जीवन विकास परिक्षा,चंद्रपूर, धनंजय साळवे, समाजकल्याण अधिकारी,चंद्रपूर, हेमंत भिंगारदेवे, गटविकास अधिकारी, पं.स. राजुरा, सुभाष ताजणे, सचिव, ग्रा.स.शि.प्र.मं. चंद्रपूर, प्रशांत पाटील, माजी प्राचार्य, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, नंदकिशोर वाढई, सरपंच, ग्रा.पं. कळमना, बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, बबन उरकुडे, उपजिल्हाप्रमूख, शिवसेना, मोहनदास मेश्राम, सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ, राजुरा, ह.भ.प.स्वामिनी गौरीताई विटोले, नागपूर, ऍड. मारोती कुरवटकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. राजुरा शहरात हे शिबिर प्रथमच होत असून या शिबिरात १६० मुल – मुली सहभागी झाले असुन त्यांना सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकास, आदर्श दिनचर्या, स्वावलंबन, स्वयंशासन व स्वयंपूर्णता इत्यादी गुणाची वाढ व्हावी याकरिता शिबिरातील अभ्यासक्रमात अध्ययनात सामुदायिक ध्यान व सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता पठण ,समूह गान, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, मराठी हिंदी भजने,स्वागत गीते, ताल,स्वर, हावभाव तसेच सामान्यज्ञान इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
शिबिराची दिनचर्या पहाटे ४ वाजता पासून ते रात्रौ ९:३० वाजेपर्यंत राहणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश उरकुंडे , तालुका प्रमूख, ग्रा.जी.वी.प.यांनी केले. प्रास्तावीक मोहनदास मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन ह.भ.प. शैलेश कावळे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरीता श्री गुरुदेव सेवा मंडळ तालुका राजुरा तसेच समस्त गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने अथक परिश्रम घेतले जात आहे. हे शिबिर निवासी असून शिबिरार्थ्याना मोफत शिक्षण, निवास व्यवस्था, अल्पोपहार भोजन देण्यात येत आहे.
——————————————–
ऍड. जयंत साळवे, अध्यक्ष, ग्रा.स.शि.प्र.मं.चंद्रपूर
बालवयातच सुसंस्कार देऊन देशाचे उज्वल भविष्य घडविण्याचे कार्य अशा बाल संस्कार शिबिरामुळे होत असून मोठया प्रमाणात मुलं – मुली सहभागी झालेत हीच या शिबिराची खरी यशस्वीता आहे. देशाचा सृजान नागरीक घडवून त्यांना कर्तव्याची, देशसेवेची, सर्वधर्म समभावाची जाणीव करून देणारे असे शिबीर अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन जयंत साळवे यांनी केले.
———————————————
मोहनदास मेश्राम, तालुका सेवाधिकारी, श्री गुरुदेव सेवा मंडळ राजुरा
राजुरा शहरात प्रथमच श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन मोठया संख्येने विध्यार्थी सहभागी झाले. पालकांनी दाखविलेल्या विश्र्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ असून विद्यार्थांना चांगल्या सवयीसोबतच देशाचा सृजान व जागरुक नागरिक घडविण्याचे कार्य या शिबिरातून होणार असल्याची माहिती मोहनदास मेश्राम यांनी दिली आहे.