डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बुद्ध जयंती उत्साहात संपन्न

109

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13मे):- स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त अभिवादन तथा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रम्हपुरीचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शनात तथागत भगवान बुद्धांचा संदेश कालसापेक्ष असून येणाऱ्या सर्व काळासाठी आणि समाजासाठी प्रासंगिक आणि प्रेरणादायी राहील कारण बुद्धाचा धम्म हा मानवी कल्याणाचा विवेकनिष्ठ विज्ञानवादी विचार आहे असे प्रतिपादन केले. 

           याप्रसंगी प्रा. माला खोब्रागडे यांनी आपल्या संबोधनात बुद्धपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करतांना सिद्धार्थ गौतमाचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती आणि महापरिनिर्वाण या त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटनांचा उहापोह करत त्यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकला. 

              मार्गदर्शनपर कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. देवेश कांबळे यांनी भगवान बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. प्रा. रंगारी सर यांनी सामुहिक बुद्धवंदना घेतली. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रा. तुफान अवताडे यांनी केले. याप्रसंगी शिक्षण संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. 

              याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदाद्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालय ब्रह्मपुरी पब्लिक स्कूल, मिराबाई नर्सिंग कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी. फार्म कॉलेज येथील शिक्षक, प्राध्यापक तथा कर्मचारीवृंद या मंगल प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.