▪️शिबिरार्त्यानी सादर केले रोमहर्षक प्रात्यक्षिके.
▪️योगासने, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, साखळदंड, लेझीम कवायतीने वेधले लक्ष.
✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.१८मे):-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणाली नुसार श्री गुरुदेव निवासी सर्वांगीण बाल सूसंस्कार शिबिर दिनांक ६ मे ते १६ मे पर्यंत राजुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरातील शिबीरार्थी यांचा समारोपीय कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपलालदादा कावळे, जिल्हा प्रचार प्रमूख, श्री गुरूदेव सेवा मंडळ चंद्रपूर यांची उपस्थिती होती.
तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार ऍड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, बबन उरकुडे, उप जिल्हाप्रमुख, शिवसेना, अविनाश जाधव, सचिव, आ.शि.प्र.मं.राजुरा, डॉ. एस. एम. वारकड, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा, संदीप जैन, अध्यक्ष, राजुरा व्यापारी असोसिएशन, सारंग गिरसावळे, अध्यक्ष रोटरी क्लब राजुरा, दिनेश पारखी, अध्यक्ष, मराठा सेवा संघ, आशीष करमरकर, अध्यक्ष, छावा फाऊंडेशन, डॉ. अरविंद ठाकरे, केशव ठाकरे, सुमन जेंगठे, सरोजनी हिवरे, महीला प्रतिनिधी, हभप स्वामिनी गौरीताई विटोले, नागपूर, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थितांनी शिबीरार्थीना मार्गदर्शन केले.
यावेळी भर पावसात न घाबरता शिबीरार्थी विद्यार्थांनी योगासने, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, साखळदंड, लेझीम कवायती व विशेष म्हणजे लाठीकाठी ला आग लावुन फिरवणे या सर्व प्रात्यक्षिकानी उपस्थितांचे लक्ष वेधले. शिबिरात घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील प्रथम तिन क्रमांक, उत्कृष्ठ शिबीरार्थी असे पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आले. सर्वाँना स्व. शंकर बापूजी लांडे स्मृती प्रीत्यर्थ बापूजी पा. लांडे, योगेश लांडे यांच्या तर्फे सन्मानचिन्ह व गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश उरकुंडे यांनी केले. तर प्रास्तावीक मोहनदास मेश्राम, राजुरा तालुका सेवाधिकारी यांनी व आभार बादल बेले यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जहीर खान, सरचिटणीस, दादाजी झाडे, कोषाध्यक्ष, रामदास चौधरी, प्रचार प्रमूख, हभप शैलेश कावळे, परशुराम साळवे, भजन प्रमूख, निखिल गिरी, युवा प्रमूख, सुरेश बेले, रामप्रसाद बुटले, देविदास वांढरे, प्रसिध्दी प्रमुख, प्रमोद साळवे, अनिल चौधरी, राजेंद्र मालेकर, परशुराम साळवे, उत्तम अवघडे, उज्वल शेंडे, गणेश कुडे, रामदास चौधरी, मारोतराव सातपुते, बाळासाहेब गोहोकार, लोमेश मडावी, प्रतिभा बोढे, नलिनी मेश्राम, सुवर्णा कावळे, अश्विनी वांढरे, शांताबाई लांडे, विमलबाई उरकुंडे आनंदराव वडस्कर, गोपाळा बुरांडे , गजानन घुगुल, महादेव पोटे, गजेंद्र ढवस, शंकर थेरे, तसेच राजुरा तालुक्यातील शेकडो गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
नऊ दिवसांच्या विश्रांती नंतर समारोपीय कार्यक्रमात मुसळधार पावसाने लावली हजेरी……
शिबीरार्थ्यानी अथक परिश्रम घेऊन मुख्य प्रशिक्षक हभप स्वामिनी गौरी विटोले, स्नेहल राऊत, चेतन अंभोरे यांच्या मार्गदर्शनात विवीध योगासने, प्राणायाम, लाठीकाठी, दांडपट्टा, मनोरे, साखळदंड, लेझीम कवायत आदिंचा सराव केला. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे परिश्रमावर पाणी न फेरता भर पावसात भिजून शिबीरार्थ्यानी आपले प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पालकांनी या शिबीराविषयी समाधान व्यक्त केले. उत्तम नियोजन व उपलब्ध सोयी सुविधा मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.



