प्रादेशिक परिवहन विभागातर्फे लायसन्स कॅम्प

85

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.21मे):-प्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन अपॉईंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

26 मे रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 27 मे रोजी एन. एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 28 मे रोजी शासकीय विश्रामगृह, चिमुर, 29 मे रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी, 30 मे रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर येथे लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.