रिपब्लिकन चळवळीचे नेते गुलाबराव श्रीरामे यांचे निधन

54

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.29मे):- येथील अॅड. शनैशचंद्र जी. श्रीरामे यांचे वडील गुलाबराव कैकाडु श्रीरामे (७२ वर्षे) लोहारा (बु.) यांचे गुरुवारी (29 मे ) पहाटे ५ वाजता दिर्घ आजाराने ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. गुलाबराव श्रीरामे हे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते असुन त्यांनी आपल्या आयुष्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला गती देण्याचे कार्य केले आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक विवाहीत मुलगी, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी, २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लोहारा (बु.) येथील स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती व नागरिक उपस्थित होते.