✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.31मे):- महाराष्ट्र अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन पुणे येथे आयोजित केले आहे. करिता 16 वर्षा वरील महिला व पुरुष यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड चाचणी चे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 2 व 3 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर च्या सिंथेटिक पटांगणात आयोजित केलेली आहे.
खेळाडू सदर स्पर्धेत 100मी, 200मी, 400मी, 800मी, 1500मी, 5000मी, 10000मी धावणे, 20000मी चालणे, थाळी, गोळा, भाला फेकणे, लांब उडी व तिहेरी उडी तसेच रीले चा स्पर्धेत भाग घेता येईल. विजयी प्रथम दोन खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटने तर्फे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना ए.एफ.आई. क्रमांक, जन्माचा दाखला, आधारकार्ड व 2 पासपोर्ट छायाचित्र असणे अनिवार्य आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804, श्री रोशन भुजाडे 77981 74435 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.



