भाजपचे भाजपला समर्थन?

178

आज केंद्रात,राज्यात भाजपचे होलसेल आणि रिटेल सरकार आहे.तरीपण इनमीन चार पांच अतिरेकी मोदी शहांच्या नाकावर टिच्चून काश्मीर मधे शिरले आणि २७ माणसे उडवली.काश्मीर पाहाणाऱ्या होशी पर्यटकांचे प्राण गेले.ज्यांनी मोदी शहा यांचेवर विश्वास ठेवला.म्हणे चला काश्मीर फिरायला.

     काश्मीर मधे जमीन आहे.माती आहे.झाडे आहेत.कुठे कुठे खोलगट दरी आहे.खूप सुंदर दिसते.कारण अशी जमीन,माती,नदी,झाडे,दरी भारतातील इतर भागात सुध्दा आहेत.पण जे सौंदर्य काश्मीर ची माती,दगड,झाडे,दरीत आहे तसे इतर ठिकाणी नाही.असा समज, गैरसमज असलेले काश्मीर मधे जातात.सौदर्य पाहायला.ज्यांना स्वताची पत्नी,मुले,आई बाप सुंदर वाटत नाहीत.काश्मीर मधे मात्र अनोखे सौंदर्य आहे.जेथे कोणीच कोणाचा नसतो.आपल्या लिला कोणीच पाहात नसतो.

      काश्मीर सुंदर आहे,ही संकल्पना जर आपण मान्य केली तर ती सौंदर्याची संकल्पना तेथील लोकांना का नाही?झाड,पहाड,नदी, डोंगर,बर्फ सुंदर आहे तर मग अशा सुंदर , नंदनवन,स्वर्ग स्वरूप भागात राहाणाऱ्या लोकांना हे सौंदर्य का कळले नाही? ज्यांना कळले त्यांचे मन सुंदर का बनले नाही? मुळातच नैसर्गिक सौंदर्यांचा परिणाम तर मानवी मनावर झाला पाहिजे.तोच हेतू ठेवून येथली माणसे तेथे जातात.पण ना तेथे जाणाऱ्यांच्या मनावर ,ना तेथे राहाणाऱ्यांच्या मनावर असा सुंदर परिणाम झालेला आढळत नाही.रामायणातील सीता आधीच पंचवटीच्या जंगलात,एका गवताच्या कुटीत राहून कंदमुळे वगैरे खाऊन समाधानी होती.तिला श्रीलंकेतील अशोक वनातील सौंदर्य कधीच लोभस वाटले नाही.जर तसे वाटले असते तर तिने मारूतीच्या हस्ते श्रीरामाला निरोप दिला असता कि,मी येथे खूप खूप सुंदर वनात आहे.माझी चिंता करू नका.

        काश्मीरला नंदनवन समजणाऱ्या सरकारने नरक बनवून ठेवलेला आहे.जेथे हजारो लोक काल्पनिक सौंदर्याची तहान भागवण्यासाठी वास्तविक घरेदारे बंद करून जातात तर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.जे त्यासाठी नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा कर वसूल करतात.पण तो पैसा नागरिकांच्या रक्षणासाठी खर्च न करता स्वताच्या रक्षणासाठी खर्च करतात.मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हे जर लोकांचे लाडके आहेत तर मग यांना भीती कोणाची?कोण मारणार आहे यांना?तरीपण एक्स,वाय,झेड सुरक्षा?आम्ही आमचा आमदार निवडून देतो.तो मंत्री झाला कि त्याला दोन चार पोलिस निरीक्षक,दहा बारा पोलिस सुरक्षेसाठी तैनात असतात.तैनात नव्हे,अक्षरशः क्रिकेटमधील किपर सारखे डॉगवाच ठेवून असतात.काय गरज आहे?हा फालतू खर्च का?एकिकडे लाडके मंत्री,लाडके मुख्यमंत्री,लाडके प्रधानमंत्री म्हणायचे आहे दुसरीकडे निवडून देणाऱ्या लोकांचीच भीत बाळगायची?कोणते तर्कशास्त्र आहे?कोणते मानसशास्त्र आहे?कोणते संरक्षण शास्त्र आहे?हेच तर्कशास्त्र, मानसशास्त्र, संरक्षण शास्त्र महाराष्ट्र,गुजरात, आंध्र , कर्नाटक मधील पर्यटकांसाठी का वापरले जात नाही?

        इनमीन चार पांच मानवसदृष हिंस्र अतिरेक्यांना धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारला भारतीय जनतेने अधिकृत केलेले आहे.जे काही करायचे ते करा,पण यांचा बंदोबस्त करा.जे नेहमीच भाजप विरोधात गरळ ओकतात त्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा कडक कारवाईला जाहिर समर्थन दिले आहे.आणखी काय पाहिजे?

    काय पाहिजे?ज्या लोकांनी भाजपचे नेतृत्व स्वीकारले.ईव्हीएम च्या मशीनवर संध्याकाळी सहा नंतर बटणे दाबली.नको ती धेंडे निवडून दिली.अशा लोकांनी आणखी कोणते समर्थन द्यावे? समर्थन तर विरोधकांनी दिले पाहिजे.पण येथे शहरातून भाजपचे पदाधिकारी मोर्चे,रैली काढून भाजपला समर्थन देत आहेत. चील पक्षासारखे?काम(……) कम और चिल्लाना जादा!

   खरे म्हणजे असे समर्थन म्हणून मोर्चा आणि रैली भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांनी काढली पाहिजे.मोदी, शहा कारवाई करो,हम तुम्हारे साथ है!

      मेरा भारत महान मधील माणसे इतके ब्रेनलेश वर्तन करीत असतील तर आश्चर्य वाटणे साहजिक आहे.मुंबईत भाजप सरकारने जैन मंदिर पाडले.तरीही त्या कृती विरोधात मोर्चा भाजप मंत्र्यांनी काढला.आश्चर्य !त्यात जैन मंडळी सहभागी होती, अग्रभागी होती.

    या दोन प्रसंगावरून वाटते कि खरोखरच भारतीय लोक बुद्धी हरवून बसलेले आहेत.त्यांना कोणीही मुर्ख बनवू शकतो.कार्ल मार्क्स म्हणाले होते कि धर्म अफूची गोळी असते.नव्हे,धर्म हेच अफूचे झाड आहे.एकदा कि त्या झाडावर चढले किंवा झाडाखाली बसले कि, बुद्धी काम करीत नाही.कोण माणूस?कोण महिला? अतिरेकी आणि व्यतिरेकी मधील फरक समजत नाही.डोके नसलेली आणि मुंडके नसलेली सारखेच दिसतात.एक रेकी करतो आणि दुसरा शेखी मारतो.एक फायर करतो आणि दुसरा पोळी भाजतो.

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव)मो:-९२७९९६३१२३