गुलाम नबी आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पुसदचा इयत्ता बारावीचा उत्कृष्ट निकाल

55

▪️कला शाखेचा 85 व विज्ञान शाखेचा 97 टक्के निकाल

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.6मे):-नुकत्याच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे द्वारे घेण्यात आलेल्या एच .एस सी परीक्षा २०२५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त गुलाम नबी आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स पुसदचा या वर्षीचा बारावीचा ऐतिहासिक निकाल लागला आहे.यामध्ये कला शाखेतून नाज परवीन दौलत खान.

94.33%,नाजमीन तबस्सुम मुहम्मद मुफिज,94.17%,पठाण जवेरीया खान माबुद खान 93.50%,आएशा शिफा शेख सत्तार 90 %तर विज्ञान शाखेतून अलविरा ऐमन शेख हमजा 82%,अलशिबा फिरदौस सैय्यद कदिरोद्दीन 80%, ऐमन फिरदौस मोहम्मद खालिद तगाले 80% अनुक्रमे विद्यार्थिनींनी गुण प्राप्त केले.या यशस्वी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी गुलाम नबी आझाद उर्दू ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्सचे प्राचार्य मोहम्मद सादिक शेख व सदर ज्युनिअर कॉलजचे प्रभारी अब्दुल नईम सर व शेख मुजीब सरांनी ट्रॉफी देऊन गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार केला.कॉलेजच्या या उत्कृष्ट निकाला बाबत संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ वजाहत मिर्झा साहेब,उपाध्यक्ष मा.के आय.मिर्झा साहेब,सचिव मा.सज्जाद मिर्झा साहेब यांनी गुणवंत विद्यार्थिनीचे व त्यांच्या पालकांचे कौतुक केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.