

भारतीय लोकसभेत निवडून दिलेली बाया माणसे कुटुंब, समाज बाबत कायदे करण्यास लायक नाहीत. त्यांना समाजाचे, कुटुंबाचे भान नाही. तर नितीचे, अब्रूचे तर मुळीच नाही. पैकी अनेकांनी तर लग्नच केले नाही. ते खरोखरच ब्रम्हचारी असतील का? लग्न न करता अनेकांशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना कसले कुटुंब? कसला समाज? कसला धर्म? कसली अब्रू? कोणी तर लग्न न करता मुले पैदा केलीत. कोणी तर लग्न करून बायको सोडून पळ काढला. असा माणूस खरोखरच कर्तव्यदक्ष असू शकतो का? कोणी तर नवरा केलाच नाही. अशी महिला इतरांची अब्रू राखू शकते का? अशी बाया माणसे कुटुंबाचे, समाजाचे, धर्माचे नेतृत्व करण्यास लायक नाहीत.त्यांना कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, धर्मव्यवस्थेचा अनुभव नाही. ज्यांनी चौकट पाळली नाही.
मोडून काढली, अशा लोकांच्या हातून कुटुंब, समाज,धर्माचे वहन, वर्धन, रक्षण अपेक्षित नाही. तरीपण आपण कुटुंब वत्सल माणसे त्यांचे नेतृत्व मान्य करीत असू तर आपण सुद्धा चुकीचे आहोतच. भरकटलेल्या माणसामागे मर्कट गेला तर फरफटत जाणारच.या भरकटलेल्या लोकांनी कुटुंबव्यवस्था आणि समाजव्यवस्था बाबत कायदे बनवले तर कुटुंब आणि समाज बरबाद होणारच.
मुलींची शारीरिक, मानसिक वाढ अठरा वर्षांनंतर होते, मुलांची एकवीस वर्षांनंतर होते, अशा चुकीच्या माहितीच्या आधारे लग्नाचे वय अठरा आधिक आणि एकवीस अधिक केले. जर हे खरे असते,मुलींची मासीक पाळी अठरा नंतरच आली असती. चौदा, पंधरा, सोळा वयात मुलींनी जोडीदार शोधला नसता. आई बापाला त्यागून पलायन केले नसते. पण प्रकृती विकृतीला शरण जात नाही. विकृत माणसांनी बनवलेले कायदे मानत नाही. तसे वयात आलेल्या मुली सरकारने बनववेले कायदे मानत नाहीत. येथेच कुटुंबाची व्यवस्था बिघडते. कुटुंब विस्कटते. परिणाम आई बापाला भोगावे लागतात. अब्रु, मान, सन्मान, प्रतिष्ठा धुळीस मिळते. काही आत्महत्या करतात किंवा ऑनर किलींग करतात.
न्यायाधीश मात्र खासदारांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात, ज्ञानी असतात. प्रामाणिक असतात. त्यांनी या कायद्यात सवलत सांगितली आहे. व्यवहारात कायदे पाळता येतात पण भावनेत कायदे पाळता येत नाही. सरकार भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. नैसर्गिक वृत्ती, प्रवृत्ती वर लगाम लावू शकत नाही. म्हणून मुले मुली सरकारचे कायदे पाळत नाहीत.
भारतीय पार्लमेंट ने कुटुंब व्यवस्थेत अनावश्यक हस्तक्षेप केल्याने भारतीय कुटुंब आणि समाज व्यवस्था बिघडत चाललेली आहे.या कायद्याविरोधात, जुलुम विरोधात व्यथा मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध नाही. हे लोकशाही चे अपयश आहे.
तरूण मुली आणि तरूण मुलांनी यातून सुरक्षित मार्ग शोधला पाहिजे. वयात आले तर लग्न तर करायचे आहेच पण आपल्या आई बापाच्या भावनांची, अब्रूची, प्रतिष्ठेची जाणिव ठेवून. तशी ईच्छा झालीच तर आई बापाशी संवाद केला पाहिजे. विश्वास संपादन केला पाहिजे. संगनमताने, सामोपचाराने पर्याय निवडला पाहिजे.
वयात आले, भावना उद्युक्त झाल्या म्हणून पळून जाऊन लग्न करणे कृतघ्न कृत्य आहे.बेजबाबदारपणा आहे. स्वताच्या जिवनाची सुरूवात अशी कृतघ्न होऊन, बेजबाबदार होऊन होत असेल तर पुढील वाट बिकट होते.स्वत:सोबतच ,आई बाप, भाऊ, बहिण, मामा, मावशी, काका, काकू यांची अब्रू वेशीवर टांगली जाते. ज्यांनी जन्म दिला, वाढवले, लाडवले, शिकवले त्यांचा विचार न करता सोडून जाणे, पळून जाणे बेमुर्वतपणाचे लक्षण आहे.
मुलींनो आतापर्यंत आईबापाने तुम्हाला सांभाळले तर आता तुम्ही आई बापाची अब्रू सांभाळा. आई बाप भाऊ बहिण यांच्या जगण्याचा विचार करा.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२



