गर्भारलेल्या मातीतून काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न

142

✒️प्रतिनिधी नाशिक(जगदीप वनशिव)

नाशिक(दि.12मे):- येथील आदर्श शिक्षिका कवयित्री,सीमा राणी बागुल यांचा गर्भारलेल्या मातीतून या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा नाशिक सिडको मधील नारायण सुर्वे कवी कट्टा सभागृहात संपन्न झाला येथे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कोळगावकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे ज्येष्ठ साहित्यिक डॉ, प्रमोद काकडे अमरावती, प्रकाशक तानाजी खोडे सर मा. रविकांत शार्दुल तात्या गझलकार कवी बाळासाहेब गिरी, मुखपृष्ठ कार खुशी मोरे, सीमाराणी बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत. पुस्तक प्रकाशनाचे सोहळा प्रास्ताविक कवी राज शेळके यांनी केले.

मनोगत कु.खुशी मोरे, व सीमा राणी बागुल यांनी केले.चंद्रकांत वानखेडे यांनी आपल्या भाषणातून गर्भारलेल्या मातीतून वेदनेचा हुंकार कवितांमधून आला आहे. स्त्रीचे जगणं दुःख आणि दुःखाचे कंगोरे नेमकेपणाने बागुल यांनी शब्दात मांडले आहे.

तसेच कवी संमेलनाचे परीक्षक जयश्री वाघ, रविंद्र दळवी यांनी केले. कविता सादरीकरणात प्रथम शुभांगी पाटील, द्वितीय सोमदत्त मुंजवाडकर, तृतीय गजानन उफाडे यांना सन्मान चिन्ह गुलाब पुष्प शाल देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सोनाली शिरवाडकर यांनी केले. अशा प्रकारे काव्य मैफिल अन् काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला