

▪️रोहन रामकृष्ण पाटील 94%गुण मिळवत केंद्रात प्रथम !
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.14मे):-तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील आदर्श माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
रोहन पाटील 94 % प्रथम , प्रिया पाटील 93.20 % द्वितीय , विनय बडगुजर 92.60 % तृतीय यांसह सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
दि. १३ मे, २०२५ रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला. परीक्षेला 45 विद्यार्थी बसले होते . सर्व 45 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल 100 % लागला आहे.
रोहन रामकृष्ण पाटील 94% गुण मिळवत सोनवद ता . धरणगाव,केंद्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब मधुकर रामजी चौधरी तसेच संपूर्ण संचालक मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. पालक वर्गातून सर्व विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव व्यक्त केला जात आहे.
सर्व एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी मनस्वी अभिनंदन केले.



