कोणताही नेता, अभिनेता, पत्रकार, शिक्षक उठतो म्हणतो कि महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. टाळ्या घेतो. वास्तव मात्र वेगळेच आहे.दोन चार पाच समाजसेवक ,राजकीय नेते पुरोगामी होते पण महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र मात्र दारूगामी झालेला आहे.
महाराष्ट्र विधानमंडळाचे निम्मा सदस्यांकडे दारूचे होलसेल किंवा किरकोळ लायसन आहे.त्यातून पाणीसारखा पैसा मिळतो.तो मतदारांना वाटला जातो.जो निवडणूक प्रचारात सहभागी होतो त्याला कुपन दिले जाते.निवडून येण्यासाठी दारूचा महत्वाचा रोल आहे.म्हणून आमदार किंवा खासदार निवडून आला कि आधी तो दारूचे होलसेल लायसन मिळवतो. निवडून यायचे असेल तर किमान रिटेल चे लायसन मिळवतो. असा लायसन होल्डर माणूस फक्त वर्षे,दोन वर्षांत आमदार निवडून येतो.कोणतेही राजकीय, प्रशासकीय, सामाजिक काम न करता. नंदुरबार जिल्ह्यातील एक लिकर किंग जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडून आला होता. आमच्या जळगाव जिल्ह्यातील असे किमान चार आमदारांचे जिल्हा स्तरावर होलसेलचे लायसन आहे.या लिकर किंग आमदारांना मतदार सुद्धा भरभरून प्रतिसाद देतात. हे विशेष. तरीही त्यांच्या सावलीतील नेते,अभिनेते महाराष्ट्र राज्याला पुरोगामी म्हणतात. टाळ्या मिळवतात.
फुले ,शाहू,आंबेडकर यांचे वारंवार नाव घेऊन आपल्या पापावर पांघरूण घालतात. नव्हे,nयाच लिकर किंग कडून देणगी घेऊन या महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करतात.मिरवणुका काढतात.
हे भयानक वास्तव साधू,संत महंत, पुजारी, पुरोहित, आचार्य, प्रवचनकार, किर्तनकार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्रोफेसर, व्यापारी, उद्योजक यांना कधीच खटकत नाही.जळगांव जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील एकाही प्रोफेसर, रीडर, प्राचार्य, कुलगुरूला खटकले नाही.आतून मेलेल्या विद्वानांचा हा जिल्हा आहे.
मी जळगाव जिल्ह्यातील वास्तव मांडतो. कारण ते मी रोज पाहातो, अनुभवतो. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील वास्तव यापेक्षा वेगळे असेल तर तुम्ही भाग्यवान आहात.
महाराष्ट्रातील अनेक गावांतील महिला दारू बंद करण्यासाठी आंदोलन करतात. पण त्याच महिला दारू विक्रेत्यांना मतदान करतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका मधे निवडून देतात. जर दारू विकणारा आमदार खासदार बनला तर बाप, नवरा, मुलगा, जावई दारू पिणारच. तर मग त्याचे का वाईट वाटून घ्यावे? पोलिस आणि कोर्टातील खटले साक्षीदार आहेत कि, अजून तरी एकाही महिलेने दारूडा नवरा विरोधात तक्रार केली नाही. एकाही महिलेने दारूड्या नवऱ्याला फारकत दिली नाही. महाराष्ट्रातील पुरूषांच्या जिवनात, राजकारणात दारूचे अनन्य स्थान आहे. त्यात महिलांचाही तितकाच हातभार लागलेला आहे. वरकरणी महाराष्ट्र पुरोगामी म्हणत असले तरीही वास्तवात महाराष्ट्र दारूगामी बनलेला आहे.
✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)मो:-९२७०९६३१२२