आंबेडकरी संज्ञेशिवाय कोणतेही साहित्य परिवर्तनवादी ठरणे अशक्य-संमेलनाध्यक्ष रमेश जीवने

178

▪️तिसरे परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलन थाटात संपन्न

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.19मे):- आंबेडकरी संज्ञा जोडल्याशिवाय कुठलेही साहित्य खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी ठरत नाही; कारण आंबेडकरी साहित्य हे जीवनाचे साहित्य आहे. जीवनाच्या सौंदर्याची मूल्ये हीच आपल्या वाड्.मयीन सौंदर्याची मूल्ये असायला हवी. कुठल्याही साहित्य कृतीची महत्ता त्यामागे असलेल्या प्रेरित मूल्यांच्या कुवतीनुसार लक्षात घ्यावी लागते. खरेतर मानवी मनाचे सृजन करणारी कृती कलारूपाच्या परिवर्तनवादी लेखकांची साहित्य प्रतिभा निस्वार्थ क्रांतीची काळजी वाहणारी असते असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष रमेश जीवने यांनी केले.

                                                     ते शब्दास्त्र विचार मंच, बॅरी.राजाभाऊ खोब्रागडे जन्म शताब्दी समिती, बॅरी. राजाभाऊ खोब्रागडे मेमोरियल ट्रस्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, बॅरी राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त, राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन, स्मृतिशेष क्रांतिवीर सुखदेवराव तिडके यांच्या 

स्मृतिप्रित्यर्थ डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन, भीम टेकडी, अमरावती येथे थाटात पार पडलेल्या तिसऱ्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून विचार व्यक्त करीत होते .

                                                    या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक रमेश जीवने, उद्घाटक प्रा.एन. व्ही. ढोके, स्वागताध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. गोपीचंद मेश्राम तर प्रमुख पाहुणे आम्रपाली पारवे, डॉ.रविकांत महिंदकर, साहित्यिक प्रा.अरुण बुंदेले होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्य संयोजक, शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे, संयोजक डॉ.नंदकिशोर दामोधरे, पद्माकर मांडवधरे, विद्रोही अविनाश गोंडाणे,देवानंद पाटील, टी. एफ. दहिवाडे, दिलीप शापामोहन, चरणदास नंदागवळी विचारमंचावर उपस्थित होते.

         सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बॅरी.राजभाऊ खोब्रागडे, क्रांतिवीर सुखदेवराव तिडके यांच्या प्रतिमेचे हारार्पण व पूजन करून अभिवादन करण्यात आले.

            अभंगकार व कवी प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित “क्रांतिकारी स्वागतगीत” सुमधुर स्वरात गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

          संमेलनाध्यक्ष रमेश जीवने पुढे म्हणाले की,” क्रांतिबा फुले हे या क्रांती लढ्यातील पहिले परिवर्तनवादी साहित्यिक,पहिले कवी, समीक्षक, नाटककार आहेत. त्यांचे अखंड मराठी कवितेची सुरुवात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मूल जन्माला आल्यावर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद मला माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर होते असे म्हणणारे साहित्य प्रेमी होते तर मानवतेचे हित स्वीकारणाऱ्या क्रांती लढ्यातले तेअग्रणी कर्तबगार आहेत असे रमेश जीवने म्हणाले.

—-

*संविधानाचा जागर होणे आवश्यक- डॉ.एन.व्ही.ढोके*

” डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नीतीमान बनण्यासाठी तथागत बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दान दिला आहे तर आर्थिक समस्यासह विविध समस्यांचे समाधान व्हावे याकरिता देशाला भारतीय संविधान हे महादान दिले आहे. साहित्यिकाने या दोन दानावर दुर्लक्ष केल्यास देश भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती सापडून देशाचे वाटोळे होईल, तेव्हा संविधानाचा जागर होणे काळाची गरज आहे,”असे विचार उद्घाटक आंबेडकरी अभ्यासक डॉ.एन.व्ही.ढोके यांनी व्यक्त केले.

*समाजपरिवर्तनासाठी आंबेडकरी साहित्याची गरज – डॉ.गोपीचं

        ” आंबेडकरी साहित्य म्हटले की मानसांचा दुष्काळ पडतो.आंबेडकरी साहित्य हे सर्वांनाच पचनी पडेल,असे नाही ज्यांना पचते तेच संकटांना दूर सारून ते अवगत करतात. समाजपरिवर्तनासाठी आंबेडकरी साहित्याची गरज आहे.”असे विचार स्वागताध्यक्ष डॉ.गोपीचंद मेश्राम यांनी व्यक्त केले.

—-

  *आंबेडकरी संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आंबेडकरी साहित्य संमेलनाची गरज – प्रा.अरुण बुंदेले

      ” आंबेडकरी संस्कृती म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी,विज्ञाननिष्ठ, व्यक्तिस्वातंत्र्यवादी,जातीभेद वर्णभेद विरहित,बुद्ध तत्त्वज्ञान मानणारी संस्कृती असल्यामुळे ही आंबेडकरी संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी अशा प्रकारच्या परिवर्तनवादी आंबेडकरी साहित्य संमेलनाची आज गरज आहे.”असे विचार प्रमुख अतिथी पदावरून साहित्यिक प्रा.अरुण बा.बुंदेले यांनी व्यक्त केले.

          याप्रसंगी प्रमुख पाहुणे आम्रपाली पारवे, डॉ.रविकांत महिंदकर यांनी आंबेडकरी साहित्यावर समोयोचित विचार व्यक्त केले.यावेळी कवी श्री. न.डोंगरे यांच्या ” मसानातील दिवे ” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

*मान्यवरांचा झाला सत्कार*

सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात योगदान देणारे प्रा. प्रेमानंद तिडके, टी. एफ. दहिवाडे, रवि दलाल,अनिल वानखडे, पत्रकार जीवन राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.अरुण बुंदेले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेले परिवर्तनवादी आंबेडकरी कविसंमेलन रंगले.

    या संमेलनामध्ये परिवर्तनवादी गझल, कविसंमेलन परिवर्तनवादी कवी व अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले. या गझल, कवी संमेलनाचे काव्यमय संचालन सुशांत मेश्राम व पवन डोंगरे यांनी केले ; तर निमंत्रित कवी गझलकार सुदाम सोनुले, प्रा.देवानंद पाटील,प्रवीण कांबळे,अविनाश गोंडाने, ‘ पद्माकर मांडवधरे,

दिलीप शापामोहन, सुशांत मेश्राम, रवि दलाल,गोवर्धन रामटेके, जया मेहरा ,ठवरे गुरुजी,मधुभाऊ हिरेकर, पद्माताई गजभिये, बागडे,गणेश थोरात, देवीलाल रवराळे, मयूर गायकवाड प्रा.गजानन सोनोने, एम.बी. बागडे,श्री.न.डोंगरे,बनसोड सर,पवन डोंगरे, यांनी आपल्या परिवर्तनवादी कविता , गझल दमदारपणे सादर केल्या.

——

*तिसऱ्या सत्रात इतिहासकार धम्मपाल देशभ्रतार यांनी सांगितला भारताचा नागवंशीय इतिहास*

      तिसऱ्या सत्रात ” ऐतिहासिक अवलोकन ” या अंतर्गत “भारत का नागवंशीय इतिहास एक चर्चा” या विषयावर मुख्य मार्गदर्शक इतिहासकार मा.धम्मपाल देशभ्रतार यांनी भारताचा नागवंशीय इतिहास सांगून सर्व श्रोत्यांना विचारमग्न केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोपीचंद मेश्राम व प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. एन. व्ही.ढोके यांनी याप्रसंगी नागवंशीय इतिहासावर विचार व्यक्त केले.संचालन सिद्धार्थ गोंडाणे व आभार प्रेरणा पांडे यांनी मानले.

*गायक अविनाश रोकडे यांचा बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम*

           चौथ्या सत्रात युवा कवी व गायक अविनाश रोकडे यांचा बुद्ध -भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात त्यांनी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील आणि तत्त्वज्ञानावरील विविध रचना सुमधुर आवाजात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

      समारोपीय कार्यक्रम मा. रमेश जीवने यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला.याप्रसंगी मुख्य संयोजक शब्दास्त्रचे प्रमुख प्रवीण कांबळे यांनी ठराव वाचन करून सर्वांचे आभार मानले.

               साहित्य संमेलनाचे संचालन ॲड.दिलीप घरडे यांनी तर साहित्य संमेलन घेण्यामागचे उद्देशायन शब्दास्त्र प्रमुख प्रवीण कांबळे यांनी मांडले.पाहुण्यांचा परिचय प्रा. देवानंद पाटील यांनी करून दिला तर आभार प्रा. पद्माकर मांडवधरे यांनी मानले.

        संमेलनाच्या यशस्वीतेसाठी श्री.न डोंगरे,भगवान गजभिये, सुशांत मेश्राम, पुंजाराम ठवरे, विशाल मोहोड,ऊर्जा कांबळे,अनिल पाटील,राष्टपाल घरडे,दिनेश मेश्राम,दिनेश टेंभुर्णे,प्रतिभा मेश्राम, करुणा तिडके,रवी गजभिये, ताराचंद करवाडे, विनोद गजभिये,सुधीर गजभिये,राजकुमार वाघमारे, रचना कांबळे,सिद्धार्थ गोंडाने, एड.सुबोध कांबळे,दिनेश मेश्राम, कल्याणी गजभिये,रमेश खांडेकर, सुनील बनसोड, अविनाश टापरे ,भीमराव वासनिक,प्रेरणा पांडे,राजेश्वरी नंदागवळी,राजेंद्र पैठणकर, मंगला मेश्राम,आकाश कांबळे,किरण शहारे,विजय पाटील,गोवर्धन रामटेके, एम. बी.बागडे, प्रकाश अंभोरे, डॉ.धनराज कावरे,चंद्रकांत मेश्राम, दीपा कांबळे,डॉ.शेषराव घरडे, प्रा.दिनेश मेश्राम यांनी सहकार्य केले.