महाराष्ट्र राज्य एम. एड. व एम. ए.एज्युकेशन प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय सहविचार सभा खेड,पुणे येथे संपन्न

21

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड /सातारा(दि.22मे):-एकच ध्यास, उच्च शैक्षणिक बांधवांचा विकास हे ब्रीद घेऊन गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद सेवेत असणाऱ्या सर्व एम.एड व एम ए.एज्युकेशन उच्च शैक्षणिक पात्रता धारक शिक्षकांना संघटनेच्या माध्यमातून एकत्रित करून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एम एड व एम ए.एज्युकेशन प्राथमिक शिक्षक संघटना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याध्यक्ष श्री प्रदीप शिंदे यांनी केले.  

पुणे जिल्ह्यातील खेड येथे आयोजित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या सहविचार सभेच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष श्री राजेंद्र भामरे, धुळे,राज्य कोषाध्यक्ष श्री भीमराव पाटील पुणे ,महिला आघाडी प्रमुख श्रीमती अंजली कट्टे सातारा ,आणि राज्य सल्लागार श्री यु टी.जाधव सांगली,खेड शिक्षक बँकेचे सभापती राजाराम शिंगाडे आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषद मध्ये सेवेत असणाऱ्या उच्च शैक्षणिक पात्रता पात्रता धारक शिक्षकांना 50 टक्के सरळ सेवेच्या केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी या पदांवर सामावून घेण्यासाठी 1967 च्या सेवाशर्ती नियमावली मध्ये तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार उच्च शैक्षणिक पात्रताधारक शिक्षकांना सेवेच्या संधी देण्यात याव्यात, शिक्षकांचा तांत्रिक सेवा क. मध्ये समावेश करण्यात यावा, याकरिता शासनाचे लक्ष वेधले असून सर्व लोकप्रतिनिधी, आमदार ,खासदार यांना संघटनेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांमध्ये भेटून वेळोवेळी निवेदन देऊन आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले.                

जिल्हा परिषद मधील रिक्त पदांवर उच्च शैक्षणिक पात्रता धारक शिक्षकांना सामावून घेतल्यामुळे तिजोरीवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे . जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे गरजेचे असल्याचे सुद्धा यावेळी सर्व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.

           तसेच संघटनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये वारंवार शासनापुढे आपले प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी सर्व राज्य पदाधिकारी कटिबद्ध असल्याची सर्वांनी ठामपणे सांगितले.

याप्रसंगी राज्य सल्लागार, तथा सांगली शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यू. टी.जाधव, राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र भामरे, धुळे , राज्य कोषाध्यक्ष भीमराव पाटील सर पुणे ,तसेच सातारा जिल्हाध्यक्ष राजाराम तोरणे, नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास हाडस, अहिल्या नगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बिन्नर, सांगली जिल्हाध्यक्ष अजय राक्षे, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महेंद्र बैसाने,धुळे जिल्हाध्यक्ष किरण ढीवरे, पुणे विभागीय अध्यक्ष डॉ. संतोष कदम आदींनी मनोगत व्यक्त करून संघटनेच्या कामावर विश्वास व्यक्त केला.. तसेच संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर सर्व जिल्हा शाखांचे विस्तारीकरण करून सभासद नोंदणी मोहिमेस शुभारंभ देखील याप्रसंगी करण्यात आला

याप्रसंगी नाशिक जिल्हा सरचिटणीस संदीप गीते सिन्नर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप, सातारा जिल्हा सरचिटणीस शरद नेवसे, विजय शिंदे ,डेंगळे सर ,विश्वनाथ कांबळे पुणे, श्रीमती तांबे मॅडम पुणे, मंगला शिंदे नाशिक, श्रीमती पाटील,श्रीमती बैसाने, आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन अजय राक्षे यांनी केले

 

आमदार बाबाजी शेट काळे यांची भेटप्रारंभी सकाळी संघटनेच्या शिष्टमंडळाने खेड,आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी शेठ काळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. संघटनेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात मागण्यांचे निवेदन दिले . अतिशय सकारात्मक चर्चा करून आमदार बाबाजी शेट काळे यांनी एम एड उच्च शैक्षणिक पात्रताधारक प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राज्य अध्यक्ष प्रदीप शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र भामरे, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, खेड शिक्षक पतसंस्था सभापती राजाराम शिंगाडे, आणि धुळे जिल्हाध्यक्ष किरण धिवरे आदी उपस्थित होते