Home चंद्रपूर पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 693 उपाययोजना

पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे 693 उपाययोजना

23

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.20मे):-यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात उष्णतेची लाट जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा 45 अशांपर्यत पोहचला असून ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी ग्रामीण पुरवठा विभागाने तालुकानिहाय 693 उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

यात विहीर खोलीकरण / गाळ काढणे / इनवेल बोरच्या 110 उपाययोजना, खाजगी विहीर अधिग्रहण करणे 16 उपाययोजना, नळ योजना विशेष दुरुस्ती करणे 192, हातपंपासह विंधन विहीर 205, कुपनलिका 80, हातपंपाची विशेष दुरुस्ती 90 अशा एकूण संपूर्ण जिल्ह्यात 693 उपाययोजना प्रस्तावित आहे.

*अशी आहे तालुकानिहाय आकडेवारी :* चंद्रपूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती – 15, विंधन विहीर – 8, कुपनलिका – 44, एकूण 77), बल्लारपूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –5, कुपनलिका – 18, हातपंपाची दुरुस्ती – 11, एकूण 44), भद्रावती : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 6, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 2, कुपनलिका – 3, हातपंपाची दुरुस्ती – 8, एकूण 29), वरोरा : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 5, खाजगी विहीर अधिग्रहण – 3, नळ योजना विशेष दुरुस्ती –14, विंधन विहीर – 8, कुपनलिका – 2, एकूण 32), चिमूर : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 4, नळ योजना विशेष दुरुस्ती –20, विंधन विहीर – 26, कुपनलिका – 2, हातपंपाची दुरुस्ती – 1, एकूण 53), मूल : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 1, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 9, एकूण 20), सावली : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –13, विंधन विहीर – 23, हातपंपाची दुरुस्ती – 2 एकूण 48).

 सिंदेवाही : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 13, नळ योजना विशेष दुरुस्ती –4, विंधन विहीर – 27, हातपंपाची दुरुस्ती – 21, एकूण 65), नागभीड : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 10, नळ योजना विशेष दुरुस्ती –8, विंधन विहीर – 8, हातपंपाची दुरुस्ती – 30, एकूण 56), ब्रम्हपुरी : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 1, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 1, एकूण 12), गोंडपिपरी : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 5, नळ योजना विशेष दुरुस्ती –9, विंधन विहीर – 9, कुपनलिका – 2, हातपंपाची दुरुस्ती – 1, एकूण 26), पोंभुर्णा : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 14, नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 10, हातपंपाची दुरुस्ती – 13, एकूण 47), राजुरा : (नळ योजना विशेष दुरुस्ती –10, विंधन विहीर – 18, कुपनलिका – 9, एकूण 37), कोरपना : (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 3, खाजगी विहीर अधिग्रहण – 13, नळ योजना विशेष दुरुस्ती –19, विंधन विहीर – 19, एकूण 54) आणि जिवती तालुक्यामध्ये (विहीर खोलीकरण / गाळ काढणे/ इनवेल बोर – 18, नळ योजना विशेष दुरुस्ती –35, विंधन विहीर – 37, हातपंपाची दुरुस्ती – 3, एकूण 93) अशा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये एकूण 693 उपाययोजना करण्यात आल्याचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुमीत बेलपात्रे यांनी कळविले आहे.