Home महाराष्ट्र शाळा प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती निर्माण करा!-राजेंद्र मोहितकर

शाळा प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती निर्माण करा!-राजेंद्र मोहितकर

44

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.10मे):-इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या शाळा प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने केंद्रीय प्रवेश पद्धती इयत्ता ११ वीच्या प्रवेश पद्धतीप्रमाणे निर्माण करावी अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मोहितकर यांनी केलेली आहे.

            सद्यस्थितीत मराठी व सेमी इंग्रजी माध्यम शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत असुन शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.विद्यार्थी व पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे जास्त आहे.येत्या दोनचार वर्षात आज अस्तित्वात असलेल्या शाळांपॆकी किमान ५० ते ६० टक्के शाळा ह्या विद्यार्थी संख्येअभावी बंद पडतील व अतिरिक्त शिक्षकांचा फार मोठा प्रश्न निर्माण होईल.

             आज जिल्हा परिषदांच्या गावोगावच्या शाळेत तसेच खाजगी प्राथमिक शाळेतही विद्यार्थ्यांची पटसंख्याच कमी असल्यामुळे खाजगी माध्यमिक शाळांना विद्यार्थीच मिळत नाही.इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी शिक्षक गावोगाव व दारोदार हिंडत आहे.विद्यार्थीच नाही तर शिक्षक नोकरीत टिकतील कसे? सर्व शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या टी.सी.आपल्या शाळेत आणण्यासाठी भरपूर श्रम व भ्रमंती करत आहे व वेगवेगळी आमिषे पालकांना दाखवत आहेत.

           आज मुलांचा जन्मदर कमी झालेला आहे.शेतकरी व मजूर मुलांना मुलगी द्यायला लोक तयार नसून त्यांचे लग्नही जुळत नाही. प्रत्येक गावखेड्यात लग्नाची ३० ,३५,४० वर्षापर्यंत मुले पडलेली आहे.अशा परिस्थितीत शाळेत नविन पिढी येणे दुरापास्त आहे.इंग्रजी माध्यमांच्या शाळा एका गावात व शहरात किती द्याव्यात याला शासनाने बंधन घातलेले नाही.

                  या सर्व बाबींवर तात्काळ उपाययोजना झाली नाहीतर अनेक शाळा येणार्या भविष्यात पटसंख्येअभावी बंद पडून शिक्षकांचे पुढील भविष्य अंधकारमय होईल,ते अतिरिक्त होईल काही शाळेत शिक्षक सेवानिवृत्त होत असल्यामुळे नविन पिढीतील शिक्षकांची नोकरी टिकत आहे.जुन्या पिढीतील शिक्षक येणार्या दोनचार वर्षात बरेचसे निवृत्त होत आहे.परंतू पुढे नविन पिढीतील शिक्षकांना नोकरी टिकविणे कठीण जाईल विद्यार्थ्यांसाठी त्यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे असे प्रतिपादन प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र मोहितकर यांनी केलेले आहे.

        शाळा प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती निर्माण करण्याचा मुद्दा नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विधानपरिषदेत मांडला होता,परंतू त्यावेळेस इतर आमदारांनी त्यांना साथ दिलेली नाही हे विशेष!