Home महाराष्ट्र जे देवळी नगरपरिषदेत होऊ शकते ते साकोलीत का नाही.? 

जे देवळी नगरपरिषदेत होऊ शकते ते साकोलीत का नाही.? 

76

▪️आयत्या बगिचावर १ कोटींचे “नमो उद्यान” होऊ देणार नाही, तो ठराव रद्द करा – जागृत जनता ; अन्यथा जनतेला धरून होणार आंदोलन 

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)

साकोली(दि.16मे):-करोडो रुपये खर्च झालेल्या उद्यानावर पुन्हा एक करोड रुपये खर्च करून “नमो उद्यान” साकारणे याकरिता बहुमताने अपवाद एक नगरसेवक वगळता निर्णय घेण्यात आला. मात्र या प्रकाराला साकोली सेंदुरवाफा नागरिकांनी नापसंती दर्शविलेली आहे. नागरिकांच्या मते मतांतरांचा विचार करणार की आपलीच मनमर्जी करणार असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे. दुसरीकडे या प्रकरणात नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त करण्यात येत असून हा “त्या” आयत्या बगिच्यावर लिपापोती करून १ कोटींचा नमो उद्यानचा ठराव रद्द करण्याची मागणी समस्त जनतेने केली आहे. 

              आधीच उद्यान असलेल्या जागेवर पुन्हा एक करोड रुपये खर्च करून नगरपरिषद काय साध्य करू इच्छिते.? नेमका याचा फायदा कुणाला होणार.? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून जुन्याच ठिकाणी नव्याने होऊ घातलेला उद्यान रद्द करा आणि नवीन ठिकाणी तयार करा अशी मागणी जोर धरत आहे. सध्या अशाच प्रकारची वर्धा जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या देवळी नगर परिषदेची एका वृत्तपत्राची बातमी सोशल मीडियावर उमटली आहे.

त्यामुळे साकोली नगर परिषदेच्या प्रशासना समोर चांगलेच संकट ओढवलेले आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी नगर परिषदचे हे उदाहरण बोलकेपणाने समोर आलेले आहे. साकोली सारखेच वर्धा जिल्ह्यातील देवळी नगरपरिषद अंतर्गत विकसित लेआउटवर ८८ लक्ष रुपये खर्च करून उद्यान तयार घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्या ठिकाणी आधीच उद्यान आहे. या नगर परिषदेच्या विशेष सभेत या संदर्भात काँग्रेसच्या ११ निवडून आलेल्या नगरसेवकांनी जनतेचे हित सांभाळत या उद्यानाला विरोध दर्शविला. आधीच असलेल्या उद्यानावर नमो उद्यान होत असेल तर शासन निर्णयानुसार व्हायला हवे.

८८ लक्ष रुपयाच्या या उद्यानाचा विरोध दर्शवित काँग्रेसच्या नगरसेवकांनी देवळीच्या नागरिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे देवळी नगरपालिकेत भाजपच्या दोन गटात वाद आहे. साकोली येथे तर भाजप विरुद्ध काँग्रेस आहे. तुलनात्मक संख्येने साकोली नगर परिषदेत एक स्वीकृत सदस्य सह काँग्रेसची बऱ्यापैकी संख्या आहे. परंतु अपक्ष एका उमेदवाराने विरोध करूनही काँग्रेसचा गट विरोधात का गेला नाही.? यावर सेंदुरवाफा साकोलीच्या नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. 

           देवळीच्या नगर परिषदेत काँग्रेसने विरोध करून ८८ लाख रुपयांच्या उद्यानाबाबत संशय व्यक्त केला. इथे तर मतदारांनी ज्यांना निवडून दिले त्यांनीच तलवार म्यान केली. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. जुन्या उद्यानावर तयार होत असलेला एक करोड रुपयाच्या बगीचा ठराव रद्द करा अशी मागणी समोर येत असून जुन्या जागेवरील बगीच्याचे काम रद्द न झाल्यास नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जागृत जनतेसह शहरातील एक अग्रगण्य निर्भिड संघटना आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याची माहिती आहे.