✒️सातारा,खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
खटाव(दि.21जून):-कमी पैशात जास्त सोने देतो म्हणून प्रविण महादू मेचे वय २३ वर्षे, , व्यवसाय-चहा हॉटेल, रा. अजमेरा कॉलनी प्लॅट नं.२, दत्तमंदीर शेजारी पिंपरी चिंचवड ता. हवेली जि.पुणे, मूळ रा. वडनेर बुद्रुक ता. पारनेर जि. अहिल्यानगर याचे हिंजवडी पुणे येथे चहाचे हॉटेल आहे. याची व देवराज अमित शिंदे रा. डिस्कळ ता. खटाव जि. सातारा मागील दोन महिन्यापासून ओळख झाली होती प्रवीण यांच्या घरातील लग्नाचे व्हाट्सअप स्टेटस पाहून देवराज अमित शिंदे याने प्रवीण यांना फोन केला व कमी पैशामध्ये देतो सांगितले परंतु ते काही दिले नाही .नंतर देवराज अमित शिंदे याने प्रवीण ला यांना फोन करुन त १,२०,००० घेऊन डिस्कळ तालुका खटाव जिल्हा सातारा येथे बोलावले घेतले माझ्याकडे १९ तारखेला रोजी दुपारी १.३० वाजणेचे सुमारास प्रवीण व त्याच ऋषीकेश गोविंद भोर हे दोघेजण देवराज अमित शिंदे याच्या घरी डिस्कळ येथे गेल्यानंतर त्याने प्रथम त्याच्या घरातील व नात्यातील सर्वांची ओळख करून दिलीत
प्रवीण याने पैसे आणण्याचे सांगून सोने दाखवण्याचे सांगितले त्याप्रमाणे देवराजाने ५ तोळे सोने दाखविले. त्यामुळे प्रवीणचा विश्वास पटला. त्यानंतर प्रवीण व त्यांचा मित्र ऋषीकेश गोविंद भोर डिस्कळ एटीएम मधून पैसे काढून आले, देवराज याची आजी शिक्षण शिंदे हिने प्रवीण ला पैसे दे म्हणजे माझा नातू देवराज हा तुला १० तोळे सोने देईल असे म्हणाली. त परंतु प्रवीण याने आदुगर सोने द्या मग पैसे देतो असे सांगितले व खिशातील रकमेला हात लावला अगोदर मला सोने दया मग मी तुम्हाला पैसे देतो असे म्हणाले त्याचवेळी देवराज अमित शिंदे , शानू अमित शिंदे ,शिक्षण लाहूर शिंदे, सुषमा सुविचार शिंदे, मीना लाहूर शिंदे ,सुमित सुविचार शिंदे सर्व रा.डिस्कळ ता. खटाव जि. सातारा अनिल ऊर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे रा. फलटण ता. फलटण जि. सातारा व इतर ४ ते ५ अनोळखी मुले यांनी तक्रारदार व त्यांचा मित्र ऋषीकेश गोविंद भोर याला धक्काबुक्की करुन, त्यांना पकडून, खाली पाडून तक्रारदार याच्या खिशातील रोख रक्कम १,२०,०००/- रुपये शिक्षण लाहूर शिंदे हिने खिशात हात घालून जबरदस्तीने हिसकावून काढून घेतले. त्याचवेळी अनिल ऊर्फ अनिमोल गोगाज्या शिंदे याने प्रवीण यांच्या कानातील दोन सोन्याच्या बाळया जबरदस्तीने हिसकावून तोडून घेतल्या. देवराज अमित शिंदे व शानू अमित शिंदे या दोघांनी प्रवीण व त्याच्या मित्र ऋषीकेश याच्या खिशातील मोबाईल सुषमा सुविचार शिंदे व मीना लाहूर शिंदे या दोघींनी जबरदस्तीने त्याचे खिशात हात घालून, दरोडा टाकून जबरदस्तीने हिसकावून काढून चोरुन नेला. देवराज अमित शिंदे व तेथे असणारी मुले ही राखाड्या रंगाच्या चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ बी.पी.३८९६ असा असून त्यांनी तक्रारदार व त्यांचा मित्र यांना धक्काबुक्की करुन जबरदस्तीने त्यांच्याजवळील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट असा एकूण १,८२,०००/- रुपये किमतीचा ऐवज दरोडा टाकून चोरुन नेला असून नमूद आरोपींनी मालमत्तेचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. नमूद आरोपींनी दरोडा टाकून चोरुन नेलेला सुमारे १,८२,०००/-रुपये किमतीचा माल व आरोपींनी गुन्हयात वापरलेली सुमारे २,००००/- रुपये किमतीची चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ बी.पी.३८९६ असा एकूण ३,८२,०००/- मुद्देमाल सदर गुन्हयातील सराईत आरोपींचा पुसेगाव पोलीसांनी कोंबिंग ऑपरेशन मोहिम राबवून कसून शोध घेऊन त्यांना शिताफीने पकडून ८ तासांच्या आत अटक केली आहे. पुसेगाव पोलीसांच्या या उल्लेखनीय कारवाईमुळे भविष्यात घडणा-या दरोडा, जबरी चो-या, घरफोड्या, घरफोड्या, चो-या यांसारख्या मालमत्तेच्या गंभीर गुन्हयांना पुसेगाव पोलीस ठाणे हददीत तसेच सातारा जिल्हयात आळा बसणार आहे.
मा.श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्रीमती सोनाली कदम उपविभागिय पोलीस अधिकारी कोरेगाव, श्री. अरुण देवकर पो.नि.स्था.गु.शा.सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक सुधीर येवले,व जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने योग्य आठ तासात आरोपींना पकडण्यात यश मिळवले.



