मानवतेचा संदेश देत जीतेंद्र गाडगे यांना नागपुर येथे बर्थ डे पार्टी मध्ये सापडलेला मोबाईल दीला परत

664

✒️नेरी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 नेरी(दि.1जून):-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील उसेगांव येथील जीतेंद्र गाडगे यांना २४ मे ला नागपुर येथील अर्जुना सेलेब्रेशन खामला येथे बर्थ डे पार्टी मध्ये सापडलेला मोबाईल ३० मे ला परत दीला आहे .

    नागपुर येथे २४ मे ला आशीष नगरकर यांच्या मुलांचा वाढदीवसाचा कार्यक्रम सांयकाळी अर्जुना सेलेब्रेशन हॉल , खामला येथे होता.त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जीतेंद्र गाडगे हे कुटुबांसहीत या कार्यक्रमाला उपस्थीत होते. कार्यक्रम चालु असतानी जीतेंद्र गाडगे यांचा मुलगा हींमाशु गाडगे याला खेळत असतानी चेअर वर मोबाईल मीळाला.पण हा मोबाईल स्वीच अॉफ होता.हा कुणाचा मोबाईल आहे याची शोधाशोध केली असता मोबाईल मालक मीळाला नाही. 

  २५ मे हा रीयल मी या कंपनीचा महागडा मोबाईल चार्जिंग केला असता व चालु केला तेंव्हा ज्यांचा मोबाईल होता त्या अमोल बारसागडे नामक व्यक्तीचा फोन आला.तेव्हा मोबाईल ज्या व्यक्तीचा होता.त्या व्यक्तीचा पत्ता लागला. नागपुर येथील बारसागडे नामक हे सुध्दा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.पण हा बंद असलेला मोबाईल या कार्यक्रमात पडला.त्यामुळे याचा शोध घेता आला नाही.

    अखेर ३१ मे ला आशीष नगरकर हे चिमूर तालुक्यातील शीवरा येथे लग्न समारंभा साठी आले असता यांच्याकडे जीतेंद्र गाडगे यांनी मानवतेचा संदेश देत मोबाईल परत दीला. या कार्यामुळे अमोल बारसागडे कुटुबांनी गाडगे कुटुंबीयांचे धन्यवाद मानले.