आदर्श शाळेत अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

454

▪️पर्यावरणाच्या सानिध्यात ” हरीत योग ” प्रात्यक्षिक सादरीकरण

▪️राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, स्काउट्स – गाईड्स, कब – बुलबुल चा उपक्रम

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.२१जुन):-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कुल राजुरा येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वर्षीच्या योग दिनासाठी चा विषय “एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग” असा होता. आरोग्य सुसंवाद आणि सजगता वाढीस लावणे असा या उपक्रमाचा उद्देश होता.

आदर्श शाळेच्या वतीने योग दिन साजरा करण्यासाठी शिक्षक, पालक व समाजातील इतर लोक यांचा जास्तीत जास्त सहभाग याबाबत जनजागृती करण्यात आली. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचाही सहभाग होता. यावेळी मंगल प्रभात योगा ग्रुपच्या योग शिक्षीका सरला आंबटकर, सविता गिरडकर, सुवर्णा घटे, माधुरी भोयर, किरण चन्ने 

, भास्कर येसेकर, सचिव, बा.शि.प्र.मं. यांच्या सोबतच आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर , राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमूख, स्काऊट मास्तर बादल बेले, जेष्ठ शिक्षिका ज्योती कल्लुरवार आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब, स्काऊट्स -गाईड्स युनिट , कब – बुलबुल व इतरही विध्यार्थीनी सक्रिय सहभाग घेतला. आदर्श प्राथमिक चे शिक्षक रुपेश चिडे, रोशनी कांबळे, सुनीता कोरडे, वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, रजनी पिदुरकर, प्राजक्ता साळवे, किसन वेडमे, वैशाली चीमुरकर , आदर्श हायस्कूल चे शिक्षक नवनाथ बुटले, विकास बावणे आदींची उपस्थिती होती. 

राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब तसेच स्काउट्स – गाईड , कब – बुलबुल च्या माध्यमातून पर्यावरणाच्या सानिध्यात “हरीत योगा ” प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. आदर्श शाळेने यापूर्वी ही शासन स्तरावरील तसेच जिल्हा परीषद, शिक्षण,क्रिडा व सांस्कृतीक विभाग तसेच स्काउट्स – गाईड्स, सामजिक वनीकरण व वनविभाग यांच्या निर्देशानुसार अनेक उपक्रम, कार्यक्रमात सक्रिय सहभाग दर्शविला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कल्लुरवार यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी केले.

———————————————

बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख, आदर्श शाळा 

        अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त शासन निर्देशानुसार ‘एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग ‘ पहिल्यांदाच ” हरीत योगा ” हा उपक्रम घेण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रिय हरीत सेनेच्या माध्यमातून शालेय परीसरात केलेल्या वृक्षारोपणामुळे बहरलेल्या हिरव्यागार मोठमोठया वृक्षांच्या छायेत योगाचे विवीध प्रात्यक्षिके सादर करण्यात आले. आरोग्य, सुसंवाद आणि सजगता वाढीस लावण्याचा उद्देश यातून नक्कीच सफल होईल असा विश्वास बादल बेले यांनी व्यक्त केला.

———————————————