नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

140

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.21जून):- नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे ‘जागतिक योग दिन’ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री. के. एम. नाईक सर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य आदरणीय श्री. ए. डब्ल्यू. नाकाडे सर उपस्थित होते. 

जागतिक योग दिनानिमित्त विद्यालयात आयोजित योग प्रात्यक्षिके श्री. सिंधीमेश्राम सर, श्री. दोनाडकर सर व श्री. देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. विविध योगासने, प्राणायाम व श्वसनाच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करतांना मार्गदर्शकांनी योगाचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लाभ तथा योगाभ्यासाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले.

मा. उपप्राचार्य श्री.ए. डब्लू. नाकाडे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, ‘योगाभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा, एकाग्रता व मानसिक संतुलन निर्माण व्हावे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून सर्वांनी स्वतः च्या निरोगी आयुष्यासाठी दररोज योग करावेत’ असे मत मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्री.के.एम. नाईक सर यांनी उपस्थितांना योग ही भारताची प्राचीन व गौरवशाली देणगी असून, आजच्या धावपळीच्या युगात त्याचे पालन आवश्यक आहे, असे सांगून सर्व सहभागींचे अभिनंदन केले. 

नेवजाबाई हितकारिणी विद्यालयाच्या वतीने योग दिनाच्या आयोजनाने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढीस लागली असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण विद्यालय परिवाराचे योगदान मोलाचे ठरले. सदर कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री रणजीत राऊत सर यांनी केले.