आशा वर्कर मृत्यू प्रकरण; सखोल चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा: आशा स्वयंमसेविकांची मागणी

89

✒️संजय बागडे(नागभीड प्रतिनिधी)मो:-91689 86378

नागभीड(दि.21जून):-नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न असलेल्या पुष्पा हरिदास मरघडे यांच्या ब्रेन हॅमरेज ने मृत्यू झाला. या मृत्यूला नवेगाव पांडव येथील वरिष्ट अधिकारी व कर्मचारी असलेल्या असून त्यांची सखोल चौकशी करून या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आशा स्वयंसेविका साठी कार्य करणाऱ्या आयटक संघटनेच्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. 

पष्पा मरघडे ह्या आशा म्हणून कार्यरत असून त्या सध्या कुटुंब सर्वेक्षणाचे काम करीत होत्या. शासणाकडून जे उपक्रम येत होते त्यात त्या सहभागी होऊन काम करीत होत्या. गेल्या सहा महिन्या पासून मानधन झाले नसतांनाही सर्व आशा या कार्यरत आहेत. असे असतांनाही अनेक आशा वर्कर ला नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व आशा सुपरवायझर ह्या मानसिक त्रास देतात. तसेच वारवार राजीनामा देण्याची धमकी देतात. पगारात मोठ्या प्रमाणात कपात करीत असतात. मानधन तत्वावर असलेल्या आशाना कारणे दाखवा नोटीस देतात.तसेच कुठे बाहेर गावी जायचे असल्यास सुद्धा विना परवानगीने जाऊ देत नाही त्यासाठी अर्ज करावा लागत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

   पुष्पा मरघडे यांना मासिक मीटिंग मध्ये उभे करून तुमच्या मुळे मला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समोर उभे राहावे लागते, तुम्ही काम करू शकत नाही तर राजीनामा द्या, पगार फुकटचा घेता का अश्या पद्धतीचे बोलणे नेहमी असायचे तसेच या केंद्राच्या परिचारिका सुद्धा त्यांची लाज वेळोवेळी काढत असल्याने पुष्पा मरघडे यांनी मनावर घेतल्याने त्यांच्या ब्रेन हॅमरेज मुळे मृत्यू झाला. याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषीवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आयटक माध्यमातून वतीने करण्यात आलेली आहे.. तसेच सदर सर्व आशानी चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांची सुद्धा भेट घेतलेली असून त्यांना सुद्धा सदर घटनेची चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. आमदार महोदयांनी सर्व आशांचे म्हणणे एकूण घेत या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या घटनेच्या संदर्भात उद्या चंद्रपूर येथे धडक मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे.