सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी येथे प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा 

93

✒️रोशन मदनकर(उप संपादक) 

ब्रह्मपुरी(दि.24जून):- सावित्रीबाई फुले ब्रह्मपुरी येथे विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षाचा आरंभ सोमवारी झाला. शाळेने आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांचे स्वागत करून दिवसभर विद्यार्थ्यांच्या आवडीची खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम,शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

     शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वच विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यां व पालकांसोबत मनमोकळा संवाद साधला. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक, गणवेश देत स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास करतानाच विद्यार्थी हा देशाचा सुजाण नागरिक घडेल अशा पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर संस्कार करावे असे मार्गदर्शन डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ.पी. आर.मेश्राम साहेब यांनी केले. यावेळी 400 पार पटसंख्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले विद्यालय ब्रह्मपुरी शाळेचे कौतुक डॉ. पी. आर. मेश्राम साहेब यांनी केले. शाळेला भौतिक आणि शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार असे आश्वासन दिले.

 प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षण विभाग चंद्रपूर यांनी दिले त्याप्रमाणे सर्वच ठिकाणी प्रवेश उत्सव साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ.पी. आर.मेश्राम साहेब,सचिव वि.पी.मेश्राम साहेब, कोषाध्यक्ष वाय.आर.मेश्राम साहेब, सदस्या लिना वि. मेश्राम मॅडम व इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

शाळेचे मुख्याध्यापक बी. एम नगराळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या कार्यकामात शिक्षक,शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा सहभाग होता. शेवट गोडधोड मेजवानीने झाला.