

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.२६जुन):-आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज जंयती निमित्त बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कुल,वडाळा पैकु, चिमूर येथे २६ जुन रोज गुरुवारला वृक्षारोपन, पालकांचे सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बोधीसत्व बाबासाहेब आंबेडकर एज्युकेशन सोसायटी चिमूरचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, प्रमूख पाहुणे सुधाकर लोणारे, नानाजी मेश्राम, असीत मानकर, प्रल्हाद बोरकर, सिद्धार्थ झिलटे, पवन ताकसांडे, जितेंद्र सहारे, संजय सर, सुभाष पेटकर, आनंद देवगडे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांना मालर्पण व द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. मान्यवर तथा बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कुल , वडाळा पैकु , चिमूर मध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या पालकांचे वृक्षाचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनंतर मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती देऊन पाल्याच्या व्यक्तिमत्व विकासात पालकांच्या योगदानाचे महत्व विषद केले. यानंतर पालकांचे तथा मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरातील कुंड्यात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक तथा सोसायटीचे कोषाध्यक्ष सिद्धार्थ झिलटे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका किरण डोये यांनी केले. या कार्यक्रमाला सोसायटीचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी तथा शाळेचे हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमा नंतर कुसुमानंद उपहार गृहाचे संचालक जगदीश रामटेक यांचे कडून अल्पोहार देण्यात आले.



