

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.26जून):-तालुक्यातील गोवरी येथील श्री गुरुदेव क्रीडा मंडळाचे खेळाडू प्रेम सुभाष जुनघरी व महेश विशाल कांबळे यांची हरिद्वार(उत्तराखंड) येथे २८ जून पासून सुरू होणाऱ्या १८ वर्षाखालील नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी नुकतीच निवड करण्यात आली.
गोवरी येथील हे दोनही खेळाडू चंद्रपूर जिल्ह्याचे शहरी व ग्रामीण खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करणार आहे.या निवडीबद्दल श्री गुरुदेव क्रीडा मंडळ व गोवरी येथील गावकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.



