

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.27जून):-चिमुर शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्व. दामोधर लक्ष्मण काळे गुरुजी यांच्या पत्नी तथा अॅड. महेशदत्त दामोधर काळे यांच्या आई श्रीमती शांताबाई काळे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
मृत्युसमयी त्या ८२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर २७ जुन रोजी उमा नदी कवडशी (रोडी) मोक्षधाम घाटावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



