

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.28जुन):- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल येथील राष्ट्रिय हरीत सेना, इको क्लब, इयत्ता पहिली व नवीन प्रवेशीत विद्यार्थांच्या हस्ते पर्यावरणासाठी सुरक्षित सिडबॉल्स पेरणी चा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आदर्श शाळेच्या परिसरात, रस्त्याच्या दुतर्फा हे सिडबॉल्स टाकण्यात आले.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रिय हरीत सेना विभाग प्रमुख बादल बेले, इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षीका प्राजक्ता साळवे, आठवीच्या वर्गशिक्षिका वैशाली चिमूरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. सिड बॉल्स हे बियाणे, सेंद्रिय कंपोस्ट खत, माती , पाणी आणि ईतर नैसर्गिक घटकांच्या मिश्रणाचे गोळे असतात जे झाडे लावण्याचे एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. सिडबॉल्स नैसर्गिकरीत्या तयार केलेले असतात त्यामुळें ते पर्यावरणासाठी सुरक्षीत असतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे असल्याने विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांना मदत होते. सावलीत गोळे सुकण्यास ठेवले आणि पावसाळा लागल्यावर हे सिडबॉल्स कठीण आणि खराब जमिनीवरही प्रभावीपणे कामं करतात, जिथे पारंपारिक पद्धतीने झाडे लावणे कठिण असते अश्या व रिकाम्या जागांवर हे सीड बॉल्स टाकले जातात .जवळपास तिन हजार आठशे वीस सिडबॉल्स तयार करून ते पेरले गेले. यात चिंचोके, निमोण्या, टेंभुर्णी, रिठा, चिकू, सीताफळ, आंबा, बोरं , करंज, विलायची चिंच अश्या विवीध प्रकारच्या बियांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी आदर्श शाळेतील राष्ट्रिय हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
———————————————
सिडबॉल हा वृक्षारोपणाचा उत्तम पर्याय- बादल बेले, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख आदर्श शाळा
उन्हाळ्यात फिरून बिया संकलन केल्या. याकरिता विध्यार्थी, शिक्षक,पालक,सामाजिक वनीकरण , वनविभागाचे , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे व नगर परिषद चे उत्तम सहकार्य लाभले. जागतीक पर्यावरण दिनाला तीन हजार आठशे वीस सिडबॉल तयार केले. मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने सर्व सीडबॉल रस्त्यांच्या दुतर्फा, आदर्श शाळेच्या परिसरात टाकण्यात आले. सीडबॉल वृक्षारोपणाचा उत्तम पर्याय असल्याचे मत बादल बेले यांनी व्यक्त केले.
———————————————
विशेष मार्गदर्शन व सहकार्य
बी. सी. येळे, विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण, दिगंबर बल्की, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र राजुरा, जी. आर. इंगळे, वनपरिक्षेत्र अधिकारी,वनविभाग राजुरा, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, उपाध्यक्ष दिपक भवर, महासचिव आशिया रिजवी, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, हायस्कूल चे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर तसेच तालुका पातळीवर अनेकांचे सहकार्य मार्गदर्शन लाभले.
———————————————



