पर्यावरण संरक्षणासाठी नार गोटूल प्रतिष्ठानचा संकल्प

103

▪️पाचगाव येथे वृक्षारोपण संपन्न

✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

राजुरा(दि.३०जुन):-पर्यावरणीय समतोल बिघडल्याने निसर्गाच्या ऋतूचक्रात बदल होताना दिसतो.निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण करणे ही सामुहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण संवर्धनामुळे जैवविविधता वाढण्यास मदत होणार असल्याने निसर्गाचे संरक्षण करण्याचा संकल्प नार गोटूल प्रतिष्ठान ने केला असून अध्यक्ष बापुराव मडावी, कार्याध्यक्ष विजयराव परचाके, उपाध्यक्ष नामदेवराव मेश्राम, सचिव आनंद कोटनाके यांनी पुढाकार घेतला आहे.

वृक्षारोपण करतांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापुराव मडावी, पाचगाव सरपंच नामदेव आळे,भुरकुंडा खुर्द उपसरपंच अजय राठोड,ग्रा.प.सदस्य मनोज कुरवटकर,पेसा समिती अध्यक्ष गंगू पाटील कुमरे, पंचायत विस्तार अधिकारी आनंद नेवारे, आदिवासी निरिक्षक नवलकरजी,ग्रा.प.अधिकारी सुनिल कुमरे (पाचगाव ),कल्याणी पारखी (भुरकुंडा खु.), बलवंत वराटे(भुरकुंडा बु.), नंदनवारजी (साखरवाही), नंदिनी कोरवते (मंगी बु.), आरोग्य केंद्र अधिकारी प्रिया बनसोडे,अधिपरिचारीका भारती मडावी, ग्रामस्थ सुरेश वडस्कर, कमलाकर भेंडे,रामा आळे, किशोर भोयर उपस्थित होते.वृक्षारोपण संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रतिष्ठान चे कोषाध्यक्ष अमोल कोरांगे, सहसचिव भारत शेडमाके, सदस्य राहुल मडावी, निखिल कुमरे, मुकुंदा कुमरे,बालविर उदे,प्रणय वेलादी यांचे सहकार्य लाभणार आहे.