

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.30जून):- केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन 2025 साठी अर्ज व नामांकन ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. हे अर्ज www.awards.gov.in या केंद्रीकृत पोर्टलवर 15 मे पासून 15 जुलै 2025 पर्यंत सादर करता येणार आहेत.
राष्ट्रीय पुरस्कारांसाठी अर्ज सादर करताना फक्त ऑनलाइन प्रणालीच स्वीकारण्यात येणार असून, प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्ज हे पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यात सविस्तर व प्रेरणादायी कार्याची माहिती देऊन भरायचे आहेत.
या पुरस्कारांसाठी पात्रता निकष, अर्जाची माहिती व मार्गदर्शक सूचनांचे सविस्तर विवरण दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.depwd.gov.in वर उपलब्ध आहे.
याबाबत अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सदर प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.



