डॉ. बरखा तिरपुडे यांची ‘एक्स्सलेंस डॉक्टर आइकॉन अवार्ड २०२५’ निवड

66

▪️डॉक्टर्स डे’ ला भोपाळ येथे होणार सन्मान

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30जून):- जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्या मार्फत आरोग्य क्षेत्रातील शैक्षणिक आणि आरोग्य सेवेत उत्कृष्ट कार्य करणा-या डॉक्टर्सला एक्स्सलेंस डॉक्टर आइकॉन या प्रतिष्ठित अवार्ड ने सम्मानित केल्या जाते. ह्या वर्षीचा एक्स्सलेंस डॉक्टर आइकॉन अवार्ड २०२५, अवार्ड डॉ. बरखा जयदेव तिरपुडे (गणवीर) ह्यांना जाहिर झाला.

                  हा अवार्ड त्यांना भोपाल येथे डॉक्टर्स डे निमित्त्य आयोजित भव्य कार्यक्रमात दिला जाणार आहे.

जीनियस वर्ल्ड रेकॉर्डस ह्यांनी अधिकृत रित्या जाहिर करतांना लिहिले आहे की ‘आम्हाला आनंदाने जाहीर करायचे आहे की जीनियस वर्ल्ड रेकॉर्डस यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट डॉक्टर आयकॉन अवॉर्ड 2025 च्या सहकार्याने डॉक्टर्स डे निमित्ताने एक ऑनलाइन पुरस्कार समारंभ आयोजित केला जात आहे. भोपाळ, मध्य प्रदेश येथील आयईएस विद्यापीठाच्या आयुर्वेद आणि सामुदायिक विभागाच्या प्राचार्या डॉ. बरखा तिरपुडे यांना या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवडले गेल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.’

डॉ. बरखा तिरपुडे, ह्या रसशास्त्र आणि भैषज्य कल्पना या विषयात एमडी आणि पीएचडी आहेत, त्यांनी शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. आयुर्वेदिक शिक्षण, शैक्षणिक नेतृत्व आणि समग्र उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे निरंतर समर्पण यामुळे या आयुर्वेद आरोग्य सेवा आणि शिक्षण क्षेत्राला खूप समृद्धी मिळाली आहे. त्या इतक्या कमी वयात आयुर्वेद शाखेचे प्राचार्य म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत. त्यांचा शोध प्रबंध हा एमडी अभ्यासक्रमात अभ्यासा साठी समाविष्ट केल्या गेला आहे.

त्यांचे कार्य हे ज्ञान, संशोधन आणि समाजसेवेद्वारे प्रभाव पाडण्याचा एक पुरावा आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट प्रयत्नांना मान्यता देतो आणि आरोग्यसेवा व शैक्षणिक बंधुत्वातील इतरांसाठी एक मानदंड स्थापित करतो.

आयुर्वेदात उत्कृष्टता आणि नवोन्मेषाच्या त्यांच्या निरंतर प्रवासासाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो.

डॉ. बरखा तिरपुडे (सौ. डॉ. बरखा दिपक गणवीर), मूळच्या तलोधी (बा.), जि. चंद्रपुर येथील असून, या परिसरात समाजिक दुर्बल घटकाला गुणवत्ता पूर्वक आणि उच्च दर्ज्याच्या आरोग्य सेवा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. डॉक्टर बरखा यांची ह्या अवार्ड करीता निवड होने हे तलोधी (बा.) गावा साठी अभिमानाची बाबा असून, डॉ. बरखा ह्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.