पोलीस पाटील सौ.प्रतिमा कोळेकर पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण पुरस्काराने सन्मानीत

50

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड/सातारा(दि.3जून):-धुळदेव, ता. माण, जि. सातारा गावच्या पोलीस पाटील सौ प्रतिमा बापूसाहेब कोळेकर यांना पोलीस पाटील म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण पुरस्कार नुकताच सन्मानित करण्यात आला. सिंधुदुर्गनगरी मध्ये समृद्धी पब्लिकेशन सिंधुदुर्ग या संस्थेने अहिल्या भीम पर्व हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

त्या कार्यक्रमांमध्ये अहिल्या भीम पर्व कला ,सामाजिक ,साहित्य , संमेलन 2025. अंतर्गत अनेक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यामध्ये धुळदेव गावच्या पोलीस पाटील सौ प्रतिमा बापू कोळेकर यांना पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पोलीस पाटील उत्सव प्रतिमा कोळेकर यांनी आपल्या सात वर्षाच्या पोलीस पाटील की मध्ये गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम चोखपणे बजावत महसूल प्रशासन पोलीस प्रशासन यांना अनेक कामांमध्ये मदत करण्याचे काम करत गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पारदर्शकपणे केले होते म्हणून त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून पुरस्कार देण्यात आला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हा पुरस्कार सुनील गोडबोले ,सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता ॲड रमाकांत खलप माजी केंद्रीय मंत्री संदीप राक्षे दिग्दर्शक लेखक यशवंतराव शेळके ओबीसी महासंघ कोल्हापूर संजय कोटलेकर अध्यक्ष पंचशील ट्रस्ट गोवा. या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे.

    हा पुरस्कार मिळाल्यानंतर मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पीएसआय अनिल वाघमोडे तसेच पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शहाजी बनगर दुर्दैव गावातील सरपंच उपसरपंच व सर्व पोलीस पाटील यांनी सौ प्रतिमा कोळेकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या