जयंती समिती बोथीच्या वतीने पिडीत कुटुंबाला मदतीचा हात

153

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

 गंगाखेड(दि.3जुन):-गंगाखेड तालुक्यातील बोथी येथे मोठ्या जल्लोषात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होते परंतु या वर्षी गावात दुखद घटना घडल्यामुळे जयंती समितीच्या वतीने कुठलाही जल्लोष न करता पीडित कुटुंबाला मदतीचा हात दिला.

अधिक माहिती अशी गावातील नेताजी सुभाष धोट या तरुण मुलाचा विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) या ठिकाणी वाहनांच्या धडकेत जागीच मृत्यू झाला सदरील घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली कारण नेताजी हा तरुण अतिशय मेहनती, जिद्दी असनारा युवक होता व आपल्या मेहनतीने घर चालवत होता पण काळाचा घात झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

सदरील घटनेमुळे संपूर्ण बोथी गावामध्ये दुःखाचे सावट पाहायला मिळाले.

नेताजीच्या पश्चात एक 2 वर्षाचा मुलगा व सहा महिन्यांची मुलगी असून अशात बोथी गावातील सर्व तरुण मुलांनी एकत्र येऊन त्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावायचा निर्णय घेतला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक कार्याचा वसा जोपासत जयंती मध्ये डी.जे.मिरवणूक किंवा इतर कार्यक्रम न करता त्या पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत करून खरी जयंती साजरी करूया आणि हीच खरी आदरांजली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी अर्पण करुया असा निर्धार व्यक्त केला व त्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. या निर्णयामुळे सर्व स्तरातून बोथी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे