

बरेच दिवस झाले. उठावचा कुठे मागमूसही नाही. काही विघ्नसंतोषी माणसांना वाटलं असेल की, उठाव संपला म्हणून. पण बाबासाहेबांच्या विचाराचा उठाव कधीच संपू शकत नाही. कारण समस्त मराठीच्या कवितेचा बाप असणाऱ्या वामनदादांचे शब्द आहेत, ते असे……….,
“वादळवारा या जलधारा मुळी न आम्हा शिवे,
तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे!”
त्यामुळेच उठावचा हा तुफानातलाच दिवा आहे? तो अशा शिंतोडयांनी विझूच शकत नाही. येत्या ७ जूनला विक्रोळीतल्या कन्नमवार नगरातील उठावच्या मासिक कविसंमेलनात पद्मश्री दया पवारांची कन्या आणि आंबेडकरी साहित्यातील वर्तमान काळातील जेष्ठ कवयित्री आणि दखलपात्र साहित्यिका प्रज्ञा दया पवार व शाहिरी क्षेत्रातला आजचा बिनीचा लोकशाहीरीचा डाॅक्टर व मुंबई युनिव्हर्सिटीचे लोककलेचे विषय प्रमुख गणेश चंदनशिवे हे जातीने उपस्थित राहणार आहेत.
खरं तर आमचा उठाव हा नेहमीच रस्त्यावर असतो. पण प्रथमच आम्ही पावसामुळे बंदिस्त सभागृह घेतलं आहे. ते यासाठीच की, आपण आमच्या कविता नेहमीच ऐकत आलोय. पण या दोन दिग्गजांना आपण समग्र ऐकावं यासाठीच हा खटाटोप आहे. पावसाला आम्ही थोपवून धरूच! नाहीतरी कालचा जातीयवादी पाऊस नेहमीप्रमाणेच आपल्या वस्तीत कधी पडतच नाही. पण जरी पडलाच तर आम्ही त्याचा चोख बंदोबस्त केलाच आहे. मग तुम्हीही येताय ना!
जयभीम!
✒️विवेक मोरे(मो:-8451932410)



