वृक्षप्रेमीचा वाढदिवस वृक्षारोपणाने केला साजरा-श्री सत्यसाई सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम

69

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.5जून):-जागतिक पर्यावरण दिन व वृक्षप्रेमी कैलास राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री सत्यसाई सेवा समिती अंतर्गत पुसद तालुक्यातील दत्तक ग्राम मांडवा येथे वृक्षरोपण करण्यात आले.

 मांडवा येथील वृक्षप्रेमी कैलास राठोड हे गेल्या पाच वर्षापासून ग्राम परिवर्तन समिती, श्री सत्यसाई सेवा समिती, ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन निस्वार्थपणे करीत आहेत.दि. ५जुन रोजी त्यांचा वाढदिवस तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोडच्या कडेला चार अशोका,शांतीधामात एक केसर आंब्याच्या वृक्षाचे रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी जिल्हा सेवा समन्वयक डॉ. संदीप चव्हाण, समिती निमंत्रक, प्रसाद केशट्टीवार,बापुराव आबाळे,कैलास राठोड, प्रदुम्न आबाळे, विजय आडे तसेच इत्यादी ग्रामस्थ मडळी उपस्थित होते.