✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.6जून):- माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी दिनांक 4 जून रोजी शहरातील पूजा मंगल कार्यालयात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी शहरातील सर्व समाज बांधव महिला, पुरुष यांची राजेंद्र पेठ गल्ली, गणपती मंदिर येथून पूजा मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर पूजा मंगल कार्यालय या ठिकाणी भगवान महेश यांची विधीवत पूजा करून महेश वंदना व आरती करण्यात आली. याप्रसंगी मंचावर समाजातील ज्येष्ठ सदस्य डॉ. शांतीलाल काबरा, हनुमानदास बियानी, कमलकिशोर मणियार, दगडू लाल सोमानी, माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विजयकुमार बंग, महिला सदस्य रमा राठी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर सोमानी, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. काबरा व अध्यक्ष विजयकुमार बंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तर आपल्या सुमधुर आवाजात भक्ती राठी यांनी महेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नरसिंग बंग यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर तापडिया, गोपाल तापडिया, अमित भंडारी, गोपाळ सारडा, आनंद सारडा, सोनू सोमानी आदींनी परिश्रम घेतले. भोजन प्रसादने कार्यक्रमाची सांगता झाली.



