सर्व पक्षीय धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीआयोजन

114

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6जून):- शनिवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी दुपारी 2 वाजता गंगाखेड व पालम तालुक्यातील सर्व पक्षीय धनगर समाज बांधवांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सार्वजनिक जयंती महोत्सवाचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात करण्यात आले असुन, सायंकाळी 5 वाजता परळी नाका येथून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.

                                            आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत असलेल्या, या जयंती महोत्सवाचे उदघाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर (साकोरे) यांच्या हस्ते होणार असून परभणी जिल्हाचे खा. संजय जाधव यांची विशेष उपस्थिती राहणार असुन माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह पाथरी विधानसभेचे आ. राजेश विटेकर, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव रबदडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोषराव मुरकुटे, लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, माजी सभापती बालासाहेब आळनुरे, जि.प.च्या माजी सदस्या करुणाताई कुंडगीर, माजी सदस्य मोहनराव गळाकाटू, किशनराव भोसले, प्रल्हादराव मुरकुटे, शंकरराव वाघमारे, रत्नाकर शिंदे, लक्ष्मणराव मुंडे, माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, कृ.ऊ.बा. समिती सभापती साहेबराव भोसले, उपसभापती संभाजीराव पोले, नंदकुमार पटेल, पंचायत समिती माजी सभापती मगर पोले, माजी उपसभापती शांताबाई माने, पं.स. माजी सदस्य लक्ष्मण आप्पा मुंडे, माधवराव गायकवाड, गिरीष सोळंके, शेख अफजल, भाई तुषार गोळेगावकर, उद्धवराव सातपुते, एकबाल चाऊस, कृष्णा सोळंके, डॉ. सूर्यकांत मुंडे, राधेश्याम भंडारी, सुभाष नळदकर, बापू सातपुते, अनिल यानपल्लेवार, गोविंद यादव, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार असुन धनगर समाज बांधवांसाठी चौडी येथे आमरण उपोषण करणारे सुरेश बंडगर यांचा यावेळी विशेष सत्कार केला जाणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधीसह एकमेकांचे कट्टर विरोधी सर्व पक्षीय दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहेत.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती च्या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जयंती समितीचे मुख्य प्रवर्तक अँड. संदीप आळनुरे, स्वागताध्यक्ष अभय कुंडगीर, अध्यक्ष बाबा पोले, सहस्वागताध्यक्ष जितेश गोरे, कार्याध्यक्ष प्रणित खजे, नियोजन समिती अध्यक्ष रामेश्वर आळनुरे, विजयराव घोरपडे, बाळासाहेब ढोले, नारायणराव कुंडगीर, उद्धवराव शिंदे, प्रल्हादराव शिंदे, जयवंत कुंडगीर, माधवराव शेंडगे आदींनी केले आहे.