कंत्राटी सफाई कामगारांचे 10 जून मंगळवारपासून काम बंद आंदोलन

219

▪️किमान वेतन, पी.एफ.व सुरक्षा साधने, सुट्टया, रजा, बोनस देण्याची मागणी

✒️लातूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

लातूर(दि.6जून):महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन, पी. एफ, सुरक्षेची साधने,सुट्टया व रजा मिळाव्यात यासाठी आठ महिन्यापासून अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने या मागण्या लावून धरलेल्या आहेत. त्यावर कोणतीच कार्यवाही होत नाही. साधी निवेदनाची दखल देखील घेतली नाही. त्यामुळे 10 जून मंगळवारपासून लातूर शहरात कचरा उचलण्याचे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसे निवेदन मनपा प्रशासक यांना अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना दिले आहे.

किमान वेतन अधिनियम 1948 कायदा कामगारांना लागू आहे. तसेच कंत्राटी कामगार अधिनियम 1970 या दोन कायद्यानुसार कामगारांना किमान वेतन मिळायला पाहिजे. तसेच रजा, सुट्टया, कामाचा जादा मोबदला, बोनस, पी.एफ. ग्रॅच्युटी, घरभाडे भत्ता, धुलाई भत्ता, सुरक्षेची साधने, मास्क, गमबूट, हातामौजे, छत्री, रेनकोट, गणवेश, आरोग्य तपासणीया सुविधा देणे दोन्ही कायद्यानुसार कामगारांना देणे बंधनकारक आहे.

अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना गेल्या आठ महिन्यापासून या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी अर्ज, विनंत्या, निवेदनद्वारे लातूर मनपाकडे पाठपुरावा केलेला आहे.

7 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय सफाई कामगार कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्या सोबत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सफाई कामगारांच्या सर्व मागण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना दिले. सदर निर्देश देऊनही आठ महिने झाले तरी कंत्राटी सफाई कामगारांच्या हिताचे, हक्काचे निर्देश डावळण्यात येत आहेत.त्यामुळे 10 जून मंगळवार पासून लातूर शहरातील कचरा उचलण्याचे, स्वछतेचे काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे. असा इशारा मनपा आयुक्तांना संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर, शहराध्यक्ष विशाल काळे, ज्योती उपाडे, लहू जगताप, परमेश्वर कांबळे, महेंद्र कांबळे, सुधीर कांबळे, अय्युब शेख, ईश्वर काळे, सुनील सगट, सचिन काळे, अंजनाताई सगट, अभिजित बनसोडे, कुमार कांबळे, अमोल शिंदे, रोहित कांबळे,अन्तेश्वर सगट, अंगद बनसोडे, सूर्यकुमार गायकवाड, ईश्वर कासारे, विनोद मोरे, पवन लांडगे, सचिन देसाई, रमाकांत शिंदे, अमोल अडसूळ आदिसह अनेक कामगाराचा समावेश होता. अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर ( 9890596098) यांनी कंत्राटी सफाई कामगारांचे 10 जून मंगळवार पासून लातुरात काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.