

✒️दोंडाईचा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
दोंडाईचा(दि.7जून):- शिंदखेडा तालुक्यातील विखुर्ले गावात शिवजयंती उत्सव समिती विखुर्ले यांच्यातर्फे बहुजन प्रतिपालक महाराष्ट्रचे आराध्य दैवत *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज ६ जुन रोजी शिवजयंती उत्सव समिती कडून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी गावातील शिवभक्त, शिवप्रेमींनी फटाक्यांची आतिषबाजी व दुग्धअभिषेक व राजेंचा जयघोष करत हा सोहळा अतिषय उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवजयंती उत्सव समिती चे अध्यक्ष नवनीत इंदास बागले,शिवजयंती उत्सव समिती प्रमुख नवनाथ मधुकर तिरमले, उपाध्यक्ष कीरण गोविंद तिरमले व दत्तात्रय राजाराम पाटील,दिपक शांतीलाल तिरमले,विजय आनंदराव तिरमले, ज्ञानेश्वर शिवदास तिरमले,प्रमोद तिरमले,प्रणव पाटील,गूलाब विठ्ठल पाटील,राहुल बागले,अविनाश रामराजे,शुभम पाटोळे,न्हानु केदार,प्रफुल तिरमले,नारायण पवार, पुष्कर तिरमले,मयुर पाटील ,जयेश पाटील,भुषण तिरमले,राहुल तिरमले समस्त शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.



